Workers will now be registered online 
कोल्हापूर

कामगारांची नोंदणी होणार आता ऑनलाईन 

शिवाजी यादव

कोल्हापूर : कोरोनासंसर्ग टाळण्यासाठी सात महिन्यांपूर्वी लॉकडाउन पुकारला. अनेक कारखाने बंद झाले, कामगार गावी गेले. 
नवीन कामगार भरती थांबली. कामगारांत चिंतेचे वातावरण आहे. अशा प्रतिकूल परिस्थितीत कामगारांना दिलासा देण्यासाठी कामगार कल्याण मंडळाचे कामकाज आता ऑनलाईन होणार आहे. यात कामगार नोंदणी व योजनांचे लाभ ऑनलाईन सुविधेद्वारे घेता येणार आहेत. 
खासगी कारखाने, दुकाने, व्यावसायिक संस्था, महामंडळात काम करणाऱ्या कामगारासाठी कमागार कल्याण मंडळातर्फे नोंदणी केली जाते. संबंधित कामगार व त्याच्या कुटुंबीयांना विविध योजनांचा लाभ दिला जातो. त्यासाठी संबंधित अस्थापनाने त्या कामगारांच्या नोंदणीसाठी लेबर आयडी नंबर मंडळाला देणे अपेक्षित आहे. 

वर्षातून एक वेळा कामगार नोंदणी शुल्क 15 ते 25 रुपये भरणे आवश्‍यक आहे. त्यातून संबंधित कामगारांच्या मुलांना मंडळातर्फे शैक्षणिक शिष्यवृत्ती दिली जाते. स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन, स्वयंरोजगार, इंग्लिश स्पिकिंग प्रशिक्षण दिले जाते. सर्व योजनांचा लाभ घेण्यासाठी बहुतेक कामगार आजवर कार्यालयात येणे कागदपत्रे सादर करणे तसेच अधिकाऱ्यांच्या सह्या घेणे, मंजुरी घेणे यासाठी हेलपाटे मारावे लागत होते. यात कामगारांचा वेळ व पैसा जात होता. ही बाब विचारात घेता कामगार कल्याण मंडळाचे कामकाज डिजिटल करण्यात येत आहे. त्यानुसार प्रत्येक जिल्ह्यातील मंडळाची कार्यालये माहिती तंत्रज्ञानाने जोडली जातील. 
कामगारांच्या योजना व तसेच मंडळाच्या कामकाजाची माहिती, नवे निर्णय याची माहिती देणारे संकेतस्थळ होईल. कामगारांना थेट नोंदणी करणे व योजनांचा लाभ घेण्यासाठी कामगारासाठी मोबाईल ऍपही तयार होत आहे. या ऍपद्वारे कामगारांना नोंदणी करणे किंवा योजनांचा लाभ घेता येणे शक्‍य होणार आहे. 

दृष्टिक्षेपात 
*जिल्ह्यात खासगी अस्थापना : 4500 
* औद्योगिक क्षेत्रात : 1 लाख 30 हजारांवर कामगार 
* व्यापारी क्षेत्रात : 1 लाख 10 हजार कामगार 
* कामगार कल्याणकडे अवघे 35 टक्के नोंदणी 


""कामगार कल्याण विभागाकडील ऑनलाईन कामकाज करण्याचे तांत्रिक काम सुरू आहे. त्यासाठी कामगार कल्याणच्या शहरातील सहाही कार्यालयांत संगणक बसविण्यात येत आहेत. त्याची जोडणी व अन्य कामे सुरू आहेत. लवकरच ऑनलाईन सुविधा कार्यान्वित होईल.'' 
- विजय शिंगाडे, कामगार कल्याण, अधिकारी. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

DRDO Scientist Case : पाकिस्तानी हेर महिलेला गोपनीय माहिती पुरविल्याचा डॉ. प्रदीप कुरुलकरवर आरोप; १२ जानेवारीला होणार सुनावणी!

Pune Tractor Theft : ट्रॅक्टर चोरणारा सराईत गुन्हेगार बीडमध्ये अटकेत; १८० सीसीटीव्ही फुटेजचा तपास घेत वाघोली पोलिसांचा मास्टरस्ट्रोक!

Latest Marathi News Live Update : पोलिसांकडून तीन दिवसांत २०१ मद्यपी वाहनचालकांवर कारवाई

Video: शुभमन गिलला T20 World Cup संघातून का वगळलं? गौतम गंभीरवर प्रश्नांचा भडीमार अन् मग...

Crime: सून सासऱ्यासोबत दारू प्यायची; मुलाला राग अनावर झाला, भलताच प्रकार उघडकीस आला, काय घडलं?

SCROLL FOR NEXT