कोल्हापूर

"मिम्स' मनोरंजनाची दुनिया विस्तारतेय 

लुमाकांत नलवडे

कोल्हापूर :  "मिम्स' हे सध्या तरुणाईचे आवडते माध्यम बनले आहे. ज्या पद्धतीने व्यंगचित्राद्वारे एखाद्या घटनेवर मार्मिक भाष्य केले जाते, तसेच सोशल मीडियाच्या जमान्यात व्यक्त होण्यासाठी मिम प्रभावी माध्यम आहे. महाराष्ट्रातील तरुण-तरुणींनी फेसबुकचे ग्रुप तयार केले आहेत. मिम्स केवळ मनोरंजनच नव्हे तर व्यवसाय बनत चालला आहे. लग्नापासून ते जाहिरातीपर्यंत आणि मनोरंजनापासून ते ट्रोलिंगपर्यंत याचा वापर होत आहे. 

मिम हे माध्यम दिसायला जरी छोटे असले तरी त्याचा प्रभाव मोठा आहे. कमी शब्दात, कमी वेळात जास्तीत जास्त आशय मांडला जातो. सोशल मीडियाचा वापर वाढत असल्यामुळे त्याची चर्चा होते. "मिम करणारे रिकामटेकडे असतात' असा एक "टिपिकल' गैरसमज आहे, पण एखाद्या विषयावर मिम बनवणे सोपं काम नाही. एखादी कल्पना सुचणे आणि त्या प्रत्येक बीटवर काम करणे हीच एक कला आहे. फक्त डब व्हिडिओ नाही, तर गाण्याचे मिक्‍सिंग असो, जुन्या मराठी चित्रपटाचा एक भाग घेऊन त्याच्यावर इंग्रजी गाणे लावून ते बीटमध्ये बसवणे, कौशल्याचा भाग आहे. कोल्हापुरात टायटॅनिकचा लिओनार्डो डी कॅंप्रिओ डिनर टेबलवर कोल्हापुरी मिसळवर चर्चा रांगड्या भाषेतील संवाद, "मराठी निक-प्रियांका', "कोल्हापुरी मामा ओबामा', असे अनेक व्हिडिओ व्हायरल झाले आहेत. परदेशातूनही याला प्रतिसाद आहे. 

मिम म्हणजे काय? 
एखाद्या चित्रपटाचा संवाद त्या दृश्‍याऐवजी रोजच्या आयुष्यातील घटनेत वापरला तर काय होईल, हा विचार म्हणजे मिम होय. तसेच एखाद्या गाण्याचे बोल-चित्रपटातील संवाद दुसऱ्याच व्यक्तीच्या तोंडी ऐकायला मिळाल्यावर त्यातून जी विनोदनिर्मिती होती ते म्हणजे मिम होय. 

फेसबुक ग्रुप...राज्यभरात चर्चेत 
"महाराष्ट्रीयन मिम्स', "आम्ही मिमकर' अशा फेसबुक ग्रुपच्या माध्यमातून अनेक तरुण-तरुणी मिम्स बनवत आहेत. मिम्सच्या फेसबुक ग्रुपमुळे राज्यातील अनेक मिमकर एकत्रित आले आहेत. त्यातून ही मनोरंजनाची दुनिया विस्तारली आहे. 


लग्नाच्या अल्बममधील फोटो घेऊन त्यावर "मिम' बनवले जाते. मिम्सच्या माध्यमातून जाहिराती होत आहेत. "मी पण सचिन' या चित्रपटाचे प्रमोशन "मिम्स'मधून झाले, खुद्द स्वप्नील जोशीने ट्‌विटद्वारे कौतुक केले होते. जाहिरातीसाठी, लग्नाच्या अल्बममधूनही आता मिम मनोरंजनाबरोबरच व्यवसाय बनत चालला आहे. 
- सुमित पाटील, हनुमाननगर. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

गणेशोत्सवासाठी धावणार चिपळूण-पनवेल मेमू, मडगाव-लोकमान्य टिळक टर्मिनस गाडीचीही घोषणा; पाहा वेळापत्रक

Sindhudurg Teacher Recruitment: सिंधुदुर्गात शिक्षक भरतीचा फज्जा? २८२ पदांची जाहिरात, मिळणार फक्त १६९ शिक्षक; पुन्हा २२५ पदे रिक्त

Mumbai Crime: मुंबईत हायप्रोफाइल वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश, २६ वर्षीय मॉडेलचा सौदा; प्रसिद्ध हॉटेलच्या रूमवर कंडोमचा बॉक्स अन्...

Marathi News Live Updates : सोलापुरात मराठा आंदोलकांचा रास्ता रोको, पुणे-हैदराबाद महामार्गावर वाहतूक ठप्प

७०,००,००,०००! सचिन तेंडुलकरने 'मुंबई-पुणे'जवळ खरेदी केला भूखंड, ३.९ एकरावर उभारणार सेकंड होम; नेमकी ही जागा कुठे?

SCROLL FOR NEXT