कोल्हापूर

चाकांबरोबर थांबला संसारही... 

सुयोग घाटगे

कोल्हापूर : सुटीच्या ऐन हंगामात हप्त्यावर घेतलेली ट्रॅव्हलर दारात उभी बघून अनेक ट्रॅव्हलर व्यावसायिकांच्या डोळ्यांतून पाणी येत आहे. गाडीचा बॅंक हप्ता, वर्षाचे टॅक्‍स, ड्रॉयव्हरचा पगार, मेंटेनन्स अशा अनेक प्रश्‍नांचा काहूर मनामध्ये घेऊन जिल्ह्यातील ट्रॅव्हलर व्यावसायिक सध्या जगत आहेत. 


फेब्रुवारी, मार्चचा परीक्षेचा हंगाम संपताच देशभरामध्ये सुटीच्या हंगामाला सुरवात होते. राज्यासह देशातील काही ठिकणी सहली आयोजित केल्या जात असत; मात्र सध्या लॉकडाऊनमुळे ट्रॅव्हलर व्यावसायिकांचीच झोप उडाली

आहे. ट्रॅव्हलरवर ड्रायव्हर, क्‍लिनर म्हणून काम करणाऱ्यांवर तर उपासमारीची वेळ आली आहे. सर्वच वाहने थांबून असल्यामुळे शिवाय यासाठीचा अन्य खर्च हा उत्पन्नाविना करावा लागत आहे. काही वर्षे ड्रॉयव्हर म्हणून नोकरी करणाऱ्यांनी थोडे मोठे स्वप्न बघत या हंगामापूर्वी कर्ज प्रकरणे करून गाड्या घेतल्या. अशा व्यावसायिकांना सर्वाधिक फटका बसला आहे. लॉकडाऊन 30 एप्रिलपर्यंत असला तरीही पुढे काय होईल हे सांगणे कठीण आहे. त्यानंतर पुन्हा पावसाळा सुरू होणार आहे. अशा परिस्थितीत हा व्यवसाय पुन्हा उभा करायला दिवाळीपर्यंतची वाट पाहावी लागणार आहे. 

सध्या वाहनातून मिळणारे उत्पन्न थांबले तरीही खर्च थांबलेला नाही. व्यावसायिकांचे नुकसान होतच आहे. त्याहूनही अधिक नुकसान या गाड्यांवर काम करणारे ड्रायव्हर, क्‍लिनरचे होत आहे. कामच नसल्यामुळे त्यांच्या उत्पन्नाचे सर्वच स्रोत थांबले आहेत. 
- गणेश पाटील, पाटील टूर्स अँड ट्रॅव्हल. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bay Of Bengal Low Presssure : हंगामी कमी दाबाचा पट्टा सक्रिय; पाऊस पुन्हा जोर धरणार, महाराष्ट्रात २२ जिल्ह्यात वादळी पावसाचा अंदाज

Sindhudurg Crime: सावंतवाडीतील बाप-लेकाचा म्हापसा येथे गूढ मृत्यू; पत्नी अत्यवस्थ; कारण अस्पष्ट, घातपाताची शंका, रात्री काय घडलं..

Ketan Agarwal Murder : ११.५ तासांच्या चौकशीत सियाच्या आई-वडिलांनी काय सांगितलं? एकाच खुलाशाने हत्या प्रकरणाला नवं वळण, सियाला तोंडघशी पाडले

Women's T20 World Cup: भारत-ऑस्ट्रेलिया आज आमनेसामने; पराभवानंतरही टीम इंडिया सेमीफायनल गाठू शकते? समजून घ्या संपूर्ण गणित!

Satara Crime: मायणीत १७ लाखांच्या बेकायदेशीर जिलेटिन साठ्यावर पोलिसांचा छापा; दोघा भावांना अटक, सातारा जिल्ह्यात खळबळ!

SCROLL FOR NEXT