Worship of Ambabai as Mahishasurmardini 
कोल्हापूर

करवीर निवासिनी श्री अंबाबाईची महिषासुरमर्दिनी रूपात सालंकृत पूजा

संभाजी गंडमाळे

कोल्हापूर : नवरात्रोत्सवातील अष्टमी निमित्त आज करवीर निवासिनी श्री अंबाबाईची महिषासुरमर्दिनी रूपात सालंकृत पूजा बांधण्यात आली. आज रात्री देवीचा जागर होणार असून रात्री साडेनऊ वाजता देवी नगर प्रदक्षिणेसाठी बाहेर पडेल. 

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हा सोहळा मोजक्या लोकांच्या उपस्थितीत होईल. फुलांनी सजवलेल्या ट्रॅक्टरवर देवीचे वाहन असेल. महाद्वार चौक, गुजरी, भाऊसिंगजी रोड, भवानी मंडप, गुरु महाराज वाडा, बिनखांबी गणेश मंदिर मार्गे पुन्हा महाद्वार चौकातून मंदिर असा नगर प्रदक्षिणेचा मार्ग राहील.

दरम्यान, करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिर यंदा भाविकांना दर्शनासाठी बंद आहे आणि उत्सव काळातील सांस्कृतिक कार्यक्रमही रद्द केले असले तरी काही भाविकांनी अनोख्या पध्दतीने यंदा सेवा दिली आहे. अमरावतीचे संगीतकार संकेत जोशी प्रत्येक वर्षी मंदिरात संगीत सेवा देतात. यंदा मंदिरात येता आले नसले तरी त्यांनी आज खास अष्टमीच्या निमित्ताने "हे अंबिके जगदंबिके' हे गीत "यू ट्यूब'वरून प्रसारित केले आहे.

संपादन - धनाजी सुर्वे 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

नेतान्याहूंचा ट्रम्प यांच्यावर दबाव, सात दिवसांत इराणवर अण्वस्त्र हल्ला! अमेरिकेतील वरिष्ठ पत्रकाराचा मोठा दावा, जगभरात खळबळ...

Mumbai Food Poisoning: लग्नाच्या जेवणातून ७०-१०० जणांना विषबाधा, वधू-वरासह वऱ्हाडी रुग्णालयात दाखल; मुंबईत खळबळ

NEET UG 2026: MBBS च्या दोन हजार रिक्त जागांवर प्रवेशाची अंतिम संधी; आजपासून अर्ज प्रक्रिया सुरू

Latest Marathi News Live Update : बारामतीत पावसाचा जोर; सहा तासांत १५८ मिमी पावसाची नोंद

Sangli DCC Bank Election Latest News : सांगली जिल्हा बँकेसाठी 93.91 टक्के विक्रमी मतदान; 13 उमेदवारांसह नेत्यांची प्रतिष्ठा पणाला, 'या' दिवशी येणार निकाल

SCROLL FOR NEXT