कोल्हापूर

वस्त्रोद्योग राज्यमंत्र्यांची मोठी घोषणा; 450 उद्योगांना लाभ

रिवायडिंग उद्योगाला २ रुपयांची वीज दर सवलत

पंडीत कोंडेकर

इचलकरंजी : वस्त्रोद्योगातील महत्वाचा घटक असलेल्या यार्न रिवायडिंग उद्योगास (Yarn rewinding industry) २ रुपयांची प्रति युनिट वीज सवलत देण्याची घोषणा आज वस्त्रोद्योग राज्यमंत्री राजेंद्र पाटील - यड्रावकर (Rajendra Patil-Yadravkar) यांनी केली. मंत्रालयात झालेल्या एका महत्वपूर्ण बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे रिवायडिंग उद्योगाला प्रथमच वीज दरात सवलत मिळणार असल्यामुळे रिवायडिंग उद्योजकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

महाराष्ट्रातील वस्त्रोद्योगातील अनेक घटकांना वीज दरातील सवलत मिळत आहे. परंतू यार्न रिवायडिंग हा उद्योग वीज दर सवलतीपासून वंचित होता. या उद्योगाची वीज दर आकारणी वाणिज्य दरांने होत आहे. यामुळे हा उद्योग अडचणीत येत होता. या उद्योगाला सावरण्यासाठी यार्न वायडींग असोसिएशनने राष्ट्रवादीचे प्रांतिक सदस्य मदन कारंडे यांच्या मार्गदर्शनाखाली राज्याचे वस्त्रोद्योग राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्याकडे वस्त्रोद्यातील इतर घटकांप्रमाणे वीज दर सवलत मिळावी, अशी मागणी केली होती. त्यानंतर मंत्र्यांनी आज मंगळवारी या संदर्भात महत्वाची बैठक घेतली.

बैठकीत वस्त्रोद्योग सचिव पराग जैन व वस्त्रोद्योग संचालक श्री.खरात, कक्ष अधिकारी मदने यांच्याशी सविस्तर चर्चा केली. त्यानंतर या उद्योगाल प्रति युनिट २ दोन रुपये वीज दर सवलत देण्याची घोषणा केली. त्याची तत्काळ अमंलबजावणी करण्यात येणार असल्याचे मंत्री यड्रावकर यांनी सांगितले. बैठकीस मदन कारंडे, अमित गाताडे यांच्यासह वायडिंग असोसिएशनचे पदाधिकारी राजेंद्र पारीक, सुनिल शिंदे, सचिन पाटील, सोमनाथ टकले उपस्थीत होते.

इचलकरंजी शहरात सुमारे ४५० रिवायडिंग उद्योग आहेत. या उद्योगांना वीज दरातील सवलतीचा मोठा लाभ मिळणार आहे.

इचलकरंजीत ४५० उद्योगांना लाभ

इचलकरंजी शहरात सुमारे ४५० रिवायडिंग उद्योग आहेत. या उद्योगांना वीज दरातील सवलतीचा मोठा लाभ मिळणार आहे. इचलकरंजीसह राज्यातील भिवंडी, मालेगाव, विटा आदी यंत्रमाग केंद्रातील रिवायडिंग उद्योगालाही या निर्णयाला मोठा लाभ मिळणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Monsoon Rain : राज्यात पावसाचा कहर ! मुसळधार पावसाने मुंबई ठप्प, पुण्यात जनजीवन विस्कळीत; मध्य महाराष्ट्र-विदर्भात अलर्ट जारी

Pune Crime: 'Sorry Mummy' मेसेजनंतर खळबळ! 'ज्युस घेऊन येते' म्हणत घराबाहेर पडलेली अल्पवयीन बेपत्ता; चुलत भावावर गुन्हा

Konkan Nuclear project: कोकणात अणुऊर्जा प्रकल्पाचे संकेत! राज्य सरकारचे विधानसभेत स्पष्टीकरण; नेमका प्रकल्प कुठे उभारणार?

Indian Army: देशसेवकाला अखेरचा सलाम! जवान तुषार भिलारेंच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; कुटुंबीयांचा आक्रोश काळजाला भिडणारा

Latest Marathi News Live Update : मुसळधार पावसाचा कहर, सायन-पनवेल हायवे जलमय

SCROLL FOR NEXT