This year Navratri will be celebrated in a simple way 
कोल्हापूर

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा नवरात्रउत्सव होणार साध्या पध्दतीने

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदाचा नवरात्रउत्सव साध्या पध्दतीने साजरा करावा, असे आवाहन अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई यांनी केले. नवरात्र उत्सवाच्या अनुषंगाने सर्व संबधित अधिकाऱ्यांची बैठक आयुक्त कार्यालय मिटींग हॉल येथे घेण्यात आली. त्यावेळी अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई बोलत होते. बैठकीस शहर अभियंता नेत्रदिप सरनोबत, उपशहर अभियंता हर्षजीत घाटगे, एन. एस. पाटील, बाबूराव दबडे, रावसाहेब चव्हाण, मुख्य आरोग्य निरिक्षक जयवंत पवार, पर्यावरण अधिकारी समीर व्याघ्राबंरे, वाहतूक नियंत्रक आर.एस. धुपकर आदी उपस्थित होते. 

अतिरिक्त आयुक्त देसाई म्हणाले, कोरोनामुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य परिस्थितीचा विचार करुन यंदाचा नवरात्र उत्सव साध्या पध्दतीने करण्याचा निर्णय शासनाने घेतला असून शासनाच्या मार्गदर्शक सुचना तसेच न्यायालयाचे आदेशानुसारच नवरात्रउत्सव साजरा करण्यात येणार आहे. मर्यादीत स्वरुपाचे मंडप असावेत, साध्या पध्दतीने हा उत्सव साजरा करतानाच घरगुती देवीची मुर्ती 2 फुटांपर्यत तर सार्वजनिक मंडळाकरीता देवीची मुर्ती 4 फुटाच्या मर्यादीत असावी. शक्‍यतो पारंपारिक देवीच्या मुर्तीऐवजी घरातील धातू किंवा संगमरवरी मुर्तीचे पुजन करावे. नवरात्र उत्सवाच्या अनुषंगाने शहर व मंदीर परिसरात स्वच्छता, साफसफाई, प्लॅस्टिक कचरा याबाबत आरोग्य विभागने विशेष दक्षता घ्यावी. यंदाच्या उत्सावात गरबा, दांडिया तसेच इतर सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करु नये, त्याऐवजी आरोग्य विषयक उपक्रम, रक्तदान शिबीरे तसेच कोरोना प्रतिबंधक उपाययोजनेची जागृतीपर कार्यक्रम आयोजित करावे.

 महापालिकेच्या माझे कुटुंब माझी जबाबदारी या मोहिमेबाबतही मंडळाने जनजागृतीवर भर द्यावा. देवीचे आगमन व विसर्जन मिरवणूका काढता येणार नसून विसर्जनाच्या पारंपारिक पध्दतीने विसर्जन स्थळी होणारी आरती घरीच करुन विसर्जन स्थळी कमीत कमी वेळ थांबावे. प्रारंभी पर्यावरण अधिकारी समीर व्याघ्राबंरे यांनी स्वागत केले. 

संपादन - धनाजी सुर्वे 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime : पुण्यात मध्यरात्री घायवळ गँगचा धुमाकूळ; गोळीबारात एक जण गंभीर जखमी, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

माेठी बातमी! 'शिरवळमध्ये भरदिवसा गाेळीबार'; घटना सीसीटीव्‍हीत कैद, तिघांना अटक, सातारा जिल्ह्यात खळबळ, नेमकं काय घडलं..

Chh. Sambhajinagar Accident : माळीवाडा पुलावर भीषण अपघात, भरधाव कंटेनरखाली दुचाकीस्वाराचा जागीच मृत्य

सरकारचा मोठा निर्णय! आरोग्य विभागाच्या आदेशानुसार ‘या’ लाखो लोकांचे जन्म-मृत्यू दाखले रद्द होणार आणि पोलिसांकडून दाखले जप्त होणार, नेमका आदेश काय?, वाचा...

Swami Samarth: स्वामी समर्थ महाराज स्वत: आशीर्वाद देताना... AI VIDEO व्हायरल, दर्शन चुकवू नका

SCROLL FOR NEXT