gold 
कोल्हापूर

खरेदी आत्ता डिलिव्हरी मात्र लॉकडाऊन नंतर ; अक्षय्य तृतीयेवर कोरोनाचे सावट...

सकाळवृत्तसेवा

कोल्हापूर - साडेतीन मुहूर्तांपैकी एक शुभ मुहूर्त असलेल्या अक्षय्य तृतीयेवर यंदा कोरोनाचे सावट आहे. या मुहुर्तावर सोने - चांदी, इलेक्‍ट्रॉनिक्‍स वस्तू, दुचाकी - चारचाकी वाहनांचे बुकिंग, फ्लॅट - घरांचे बुकिंग केले जाते. यंदा मात्र टाळेबंदीमुळे या सर्वांनाच ब्रेक लागला आहे. त्यामुळे या क्षेत्रात अक्षय्य तृतीयेच्या मुहुर्तावर होणाऱ्या कोट्यावधींच्या उलाढाली ठप्प झाल्या आहेत. यावर आधारित असलेल्या व्यवसायांनाही याचा फटका बसला आहे.
मात्र, यंदा या खरेदीवर कोरोनाचे सावट ओढावले आहे. एरवी या दिवशी गजबणारा गुजरी, महाव्दार रोड, शिवाजी रोड, बिंदू चौक या सर्व परिसरात निरव शांतता पसरली आहे.

अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी केल्यास ते वृद्धिंगत होत जाते, अशी धारणा आहे. त्यामुळे या दिवशी प्रामुख्याने एक ग्रॅमपासून ते तोळ्यापर्यंतची सोनेखरेदी करण्यावर भर दिला जातो. या खरेदीतून मोठी उलाढाल होते. त्यामुळे या खरेदीला मोठा फटका बसला आहे. तसेच या मुहुर्तावर मोबाईल, एलईडी टिव्ही, फ्रीज या वस्तूंची खरेदीही मोठ्या प्रमाणात केली जाते. सध्या इलेक्‍ट्रॉनिक्‍स दुकानेही बंद असल्याने इलेक्‍ट्रॉनिक्‍स वस्तूंची खरेदी विक्रीही होणार नाही.

ऑनलाईन खरेदीकडे कल

शहरातील ग्राहकांना सोने, चांदी खरेदी करता यावी, यासाठी दागिन्यांच्या मोठ्या शोरूम्सनी ऑनलाईन खरेदीची सुविधा सुरू केली आहे. वेबसाईटवरील डिझाईन्स पाहून ग्राहकांना नोंदणी करता येते. या दागिन्यांची डिलिव्हरी मात्र लॉकडाऊन नंतर होणार आहे. अशा खरेदीकडे शहरातील ग्राहकांनी पसंती दिली आहे, असे "तनिष्क चे प्रसाद कामत यांनी सांगितले. मात्र गाड्यांचे बुकिंग ऑनलाईन करता येत असले तरी ग्राहकांनी त्याकडे पाठ फिरवली आहे.
 

अक्षय्य तृतीयेच्या मुहुर्तावर सोन्याची खरेदी मोठ्या प्रमाणावर होते. मात्र लॉकडाऊनमुळे सध्या सोने चांदी ग्राहकांना खरेदी करता येणार नाही. आम्ही सराफ व्यावसायिक शासनाच्या नियमांचे पालन करणार आहोत.
- भरत ओसवाल, अध्यक्ष, कोल्हापूर जिल्हा सराफ संघ

लॉकडाऊन काळात गाड्यांचे मार्केट थंडावलेले आहे. दुचाकींची नोंदणी करता येते. मात्र त्याकडे ग्राहकांनी पाठ फिरवली आहे.
- राजेंद्र गुरव, मोहिते सुझुकी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मोठी बातमी! शेतकऱ्यांना ३० जूनपूर्वी कर्जमाफीचा लाभ; २ लाखांचे थकीत पीककर्जाचीच माफी, अशी नसणार अट; ‘या’ शेतकऱ्यांना मिळणार लाभ, वाचा...

Quick & Easy Morning Breakfast Recipe: आठवड्याची सुरुवात करा हेल्दी नाश्त्याने ; फक्त 10 मिनिटांत बनवा 'मल्टी व्हिटामिन भेळ'

Panchang Today 30 Marach 2026 : आजचा दिवस शुभ; मुहूर्त, राहू काळ आणि उपाय जाणून घ्या

गुन्हेगारांचे धाबे दणाणले! सोलापूर पोलिस अधीक्षकांचे विशेष पथक; जुगार अड्डे, अवैध वाळू वाहतूक, ऑर्केस्ट्रा बार, अवैध दारुनिर्मिती, विक्रीवर असणार लक्ष

MI vs KKR Live : रायन रिकल्टनच्या ८१ धावा, रोहित शर्माच्या ७८... तरीही प्लेअर ऑफ दी मॅच पुरस्कार तिसऱ्यालाच; जाणून घ्या का?

SCROLL FOR NEXT