yesterday the temple of jyotiba open 2500 people visit in kolhapur 
कोल्हापूर

चांगभलच्या जयघोषात जोतिबाचे दर्शन ; अडीच हजार भाविकांनी लावली हजेरी

निवास मोटे

कोल्हापूर (जोतिबा डोंगर) : पन्हाळा तालुक्यातील श्री. क्षेत्र जोतिबा डोंगर येथील श्री ज्योतिर्लिंग मंदिरात काल पहिल्याच दिवशी सुमारे अडीच हजार भाविकांनी दख्खनचा राजा श्री जोतिबा देवाचे दर्शन घेतले. काल सकाळी सात महिने चोवीस दिवसानंतर जोतिबा मंदिर दर्शनासाठी खुले करण्यात आले. त्यामुळे सर्व अटी व नियमांचे पालन करून भाविकांना मंदिरात सोडले जात होते.  

भाविकांच्या कपाळी माखलेला गुलाल व दर्शन घेऊन आल्यानंतर त्यांच्या चेहर्‍यावर समाधान दिसत होते. सात महिन्यानंतर जोतिबा मंदिरात चांगभलचा जयघोष सुरू झाला. दिवाळीच्या सुट्ट्या असल्यामुळे काल आणि आज भाविक तसेच पर्यटक मोठ्या संख्येने  डोंगरावर दाखल झाले आहेत. पण मंदिरात दर्शनासाठी सोडण्याची वेळ सकाळी ९ ते दुपारी १२, आणि दुपारी ४ ते सायंकाळी ७ पर्यंत असल्याने या वेळेत येणाऱ्यांनाच दर्शन मिळते. इतर भाविकांना मात्र कळसाचे दर्शन घेऊन माघारी जावे लागत आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मंदिरात सर्व नियमांचे पालन केले जात आहे. 

"आम्ही जोतिबा देवाचे दर्शन घेण्यासाठी गेली कित्येत दिवस वाट पाहत होतो. मात्र कोरोनामुळे ते शक्य झाले नाही. काल मंदिर उघडले आणि आम्ही दर्शनासाठी डोंगरावर आलो. देवाच्या दर्शनाने समाधान झाले."

- जाधव कुटूंबिय, पुणे

संपादन - स्नेहल कदम 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rekha Gupta Organ Donation : पंतप्रधान मोदींच्या वाढदिवशी रेखा गुप्तांचा मरणोत्तर अवयवदानाचा संकल्प; नागरिकांनाही आवाहन

आमचे मार्ग आता जुळत नाहीत! Prithvi Shaw अन् आकृती अगरवाल यांचा वेगळा होण्याचा निर्णय; क्रिकेटपटूच्या पोस्टची चर्चा...

लग्नानंतर स्वयंपाक शिकली मेघना एरंडे; म्हणाली- माहेरची आणि सासरची लोकं गणेशोत्सवात आमच्या घरी येतात आणि...

Tata Sons Reappointment : RBI च्या निर्देशानंतर टाटा समूहात मोठा उलटफेर! नोएल टाटांचा विरोध डावलून एन. चंद्रशेखरन यांची अध्यक्षपदी पुनर्नियुक्ती

NTA Exam Calendar 2026-27 Out : विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! जेईई मेन, यूजीसी-नेटसह प्रमुख परीक्षांच्या तारखा जाहीर; पाहा संपूर्ण वेळापत्रक

SCROLL FOR NEXT