कोल्हापूर

सांगली : महापुरामुळे नुकसान, नैराश्यातून तरुणाची आत्महत्या

अजित झळके

वाळवा (सांगली) : कृष्णेला (Krushna River)आलेल्या महापूरात उसाचे पीक बुडाले,जनावरांचा गोठा पाण्यात बुडाला,पुरात जनावरांचे झालेले हाल असह्य न झाल्याने आलेल्या नैराश्यातून आज एका तरूण शेतकऱ्यांने आत्महत्या केली. नागठाणे (ता. पलूस) (Nadthane)येथील गणेशनगरच्या दक्षिणेस ही घटना उघडकीस आली. निलेश बाळकृष्ण पवार ( वय- 22) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. जनावरांच्या गोठ्यात लाकडी वाशाला दोरीच्या सहाय्याने निलेशने गळफास घेतला. याप्रकरणी भिलवडी पोलीसात नोंद आहे. या घटनेने पलूस तालुक्यात खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या आणि पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार,

निलेश पवार हा शेती करत होता. शेतातच त्याचा जनावरांचा गोठा आहे. गेल्या आठवड्यात कृष्णा नदीला आलेल्या पुरात निलेशचे ऊस पीक बुडाले. शेतातच असलेला जनावरांचा गोठा बुडाला. गोठ्यातील जनावरे त्याने गावात नेली होती. पुराचे पाणी कमी झाले आहे. म्हणून जनावरे पुन्हा गोठ्यात न्यायची तयारी त्याने केली होती. म्हणून आज सकाळी तो सायकलने गोठ्याकडे गेला.

काहीशी साफसफाई केली. त्याचवेळी त्यांने गोठ्यातच गळफास घेतला. त्याचा लहान भाऊ गोठ्यात गेल्यावर ही घटना उघडकीस आली. गावात ही घटना वा-यासारखी पसरली. अनेकांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलीस हवलदार विशाल पांगे आणि मऺगेश गुरव यांनी पऺचनामा केला. निलेशचे वडील बाळकृष्ण दशरथ पवार यांनी पोलीसात फिर्याद दिली. निलेशच्या मागे आईवडील, लहान भाऊ आणि बहिण आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

IND vs WI: तिलक वर्माचा ब्रेनफेड मुमेंट... चौकार झाला असं वाटलं अन् झाला विचित्रपद्धतीने रन आऊट; पाहा Video

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत आज दिवसभरात काय घडलं? एका क्लिकवर पहा सर्व महत्त्वाचे अपडेट्स

SCROLL FOR NEXT