Kolhapur Crime esakal
कोल्हापूर

Kolhapur Crime : जबरदस्तीनं शेतात ओढत नेलं अन् बलात्कार करून नराधमानं युवतीचा केला खून

सनीने तिला जबरदस्तीने ओढत एका शेतात नेले. तेथे तिच्यावर बलात्कार केला.

सकाळ डिजिटल टीम

कपडे तसेच मृतदेहाजवळ पडलेल्या साहित्यावरून वडिलांनी मृतदेह ओळखला. त्यानंतर पोलिसांनी तपास करीत सनी कांबळेला ताब्यात घेतले.

घुणकी : रोजंदारीवर काम करणाऱ्या कुटुंबातील एका युवतीचा (Young Girl) बलात्कार करून खून केल्याचा प्रकार काल (सोमवार) दुपारी वाठार तर्फ वडगाव (ता. हातकणंगले) येथे उघडकीस आला. पेठवडगाव पोलिस (Peth Vadgaon Police) ठाण्यात याची नोंद आहे.

या प्रकरणी पोलिसांनी काही तासांतच संशयित सनी अरुण कांबळे (रा. वाठार तर्फे वडगाव) याला ताब्यात घेतले. त्याने गुन्ह्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी : संबंधित कुटुंब लातूर जिल्ह्यातील आहे. ते रोजंदारीसाठी या परिसरात आले होते. संबंधित युवतीला सनी वारंवार त्रास देत होता. त्यावरून त्याला समजही देण्यात आली होती.

युवती रविवारी (ता. ८) सायंकाळी कामावरून घरी परत येत होती. त्यावेळी सनीने तिला जबरदस्तीने ओढत एका शेतात नेले. तेथे तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर तिचा गळा आवळला. त्यात तिचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर त्याने तिचा मृतदेह झुडपात टाकून दिला. घटना घडलेले ठिकाण निर्जन आहे. त्यामुळे खुनाचा प्रकार कुणाला कळला नाही.

संबंधित युवती घरी न परतल्याने कुटुंबीय चिंतेत होते. त्यांनी तिचा सलग पाच-सहा दिवस शोध घेतला. दरम्यान, घटनास्थळावरून दुर्गंधी येऊ लागली होती. ते आज एका शेतकऱ्याच्या लक्षात आले. त्याने पुढे जाऊन पाहिले असता युवतीचा मृतदेह सडलेल्या स्थितीत आढळून आला. त्याने तातडीने ही माहिती पेठवडगाव पोलिसांना दिली.

पोलिस उपनिरीक्षक गिरीश शिंदे, हवालदार रवी गायकवाड, महेश गायकवाड, मिलिंद टेळी, अजित पाटील, जितेंद्र पाटील आदींनी घटनास्थळी धाव घेतली. कुत्र्यांनी मृतदेहाचे लचके तोडले होते. पोलिस तातडीने तपास करीत संबंधित युवतीच्या कुटुंबीयांपर्यंत पोहोचले. कपडे तसेच मृतदेहाजवळ पडलेल्या साहित्यावरून वडिलांनी मृतदेह ओळखला. त्यानंतर पोलिसांनी तपास करीत सनी कांबळेला ताब्यात घेतले.

त्याच्याकडे कसून चौकशी केल्यावर त्याने गुन्ह्याची कबुली दिली. दरम्यान, घटनास्थळी पोलिस उपअधीक्षक रोहिणी साळुंके, वडगाव पोलिस ठाण्याचे निरीक्षक भैरव तळेकर यांनी भेट दिली. पोलिसांनी मृतदेह सीपीआरमध्ये पाठविला. तेथे शवविच्छेदन झाले. त्यानंतर रात्री उशिरा अंत्यसंस्कार झाले. पोलिस व वैद्यकीय पथकास अमित कोळी, धोंडिराम वडर, उत्तम कोळी यांनी सहकार्य केले. दरम्यान, घटनास्थळी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. उपविभागीय पोलिस अधिकारी रोहिणी सोळंके, निरीक्षक भैरव तळेकर तपास करत आहेत.

रेकॉर्डवरील गुन्हेगार

सनी अरुण कांबळे बांधकाम मजूर आहे. तो अविवाहित आहे. त्याने संबंधित युवतीकडून चैनीसाठी वारंवार पैसे उकळल्याचे तपासात पुढे आले आहे. तो रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. काही महिन्यांपूर्वी त्याच्यावर वडगांव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्याचे पोलिसांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maruti Cars: जीएसटी कमी झाल्यानंतर अल्टो, स्विफ्ट, डिझायर आणि वॅगनआरची किंमत किती असेल?

Prithvi Shaw : IPL 2026 मध्ये पृथ्वी शॉ CSK च्या ताफ्यात? ऋतुराज गायकवाडची मध्यस्थी? फ्रँचायझीने पोस्ट केला Video

न्यायालये ताकदवान नाहीत, हात बांधलेत असं आम्ही म्हणू का? सरन्यायाधीशांचा सरकारला सवाल

Diabetes in Kids: तुमच्या मुलांना डायबिटीजचा धोका आहे का? 'ही' ८ लक्षणे वेळेत ओळखून घ्या योग्य काळजी

Shivaji Maharaj: पुण्यातील मानाचा पहिला गणपती अन् शिवरायांचं बंधन! ; मावळे मोहिमेवर जाण्याआधी घेत असत बाप्पाचं दर्शन

SCROLL FOR NEXT