कोल्हापूर

दुचाकीला टेकून उभारणे पडले महागात...

सकाळ वृत्तसेवा

गांधीनगर (कोल्हापूर)  ः दुचाकीला टेकून उभारल्याच्या रागातून बापलेकाने उचगाव ब्रीजजवळ एकाल हॉकी स्टीकने जबर मारहाण केली. प्रकाश डुंडाप्पा गुडसे (वय 40, रा. डफळे कॉलनी उचगाव) असे जखमीचे नाव आहे. त्यात त्यांच्या हाताला गंभीर दुखापत झाली. महिपती यादव व त्याचा मुलगा सुदर्शन महिपती यादव (यादववाडी, उचगाव) यांच्यावर गुन्हा नोंद झाला आहे.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी, उचगाव ब्रीजजवळ प्रकाश गुडसे व त्याचा मित्र चहाच्या टपरीजवळ दुचाकीला टेकून उभे राहिले होते. दरम्यान महिपती यादव आला आणि त्याने शिवीगाळ करत गुडसे याला धक्का मारून पाडले. ही गाडी तुझ्या बापाची नाही, तू गाडीला टेकून का उभा राहिलास असे विचारत महिपती यादवचा मुलगा सुदर्शन यादव याने हॉकी स्टीकने मारहाण करण्यास सुरुवात केलो. हॉकी स्टीकचा जबर मार हातावर बसल्याने गुडसे याला सीपीआर रुग्णालयात दाखल केले.

याबाबतची फिर्याद जखमी प्रकाश गुडसे यांनी दिली असून गांधीनगर पोलिसांत महिपती यादव व त्याचा मुलगा सुदर्शन यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
 

 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election: पुन्हा सूरत पॅटर्न! शेवटच्या दिवशी काँग्रेस उमेदवाराने अर्ज मागे घेत केला भाजप प्रवेश..काय आहे प्रकरण?

Latest Marathi News Live Update: पंतप्रधान मोदी सोलापुरात दाखल; थोड्याच वेळात होणार सभा

Champions Trophy 2025 : जागा ठरली! पाकिस्तानने केली मोठी घोषणा; PCBच्या निर्णयानंतर BCCI उचलणार मोठं पाऊल?

Kansas Bizarre : आधी बायकोची केली हत्या, मग विम्याच्या पैशातून खरेदी केली चक्क 'सेक्स डॉल'.. पोलीसही झाले हैराण!

Health Care : अवकाळी पावसानंतर सावधगिरी बाळगा; सर्दीसह दमा, श्वसन विकारात होते वाढ

SCROLL FOR NEXT