youth crime case in chikodi nipani belgaum crime marathi news 
कोल्हापूर

‘आमच्या घरच्यांना आपले लग्न मान्य नाही. तू चिक्कोडीला ये, म्हणत केला तिचा विश्वासघात

सकाळ वृत्तसेवा

चिक्कोडी (बेळगाव)  : मैत्रिणीला लग्नाचे आमिष दाखवून बोलावून विष पाजून खून केल्याची घटना येथे उघडकीस आली. दीपाली पवार (वय २५, वड्डर गल्ली, अंकली) असे दुर्दैवी तरुणीचे नाव आहे. तिचा खून करणाऱ्या युवकाचे नाव राजू कुरबर (वय २९, रा. अंकली) असे आहे. लग्नातील अडथळा दूर करण्यासाठी त्याने हे कृत्य केले. चिक्कोडी पोलिसांत घटनेची नोंद झाली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी, 
दीपाली आणि राजू यांचे प्रेमसंबंध होते. राजूच्या घरच्यांनी दुसरीकडे स्थळ पाहून साखरपुडा केला होता. दीपालीशी लग्न करण्याची इच्छा त्याने घरी बोलून दाखवली होती. दुसऱ्या जातीच्या मुलीबरोबर लग्न करू नको, असे सांगून घरच्यांनी दुसरीकडे त्याचे लग्न ठरवले. २१ जानेवारीस साखरपुडा झाला होता. २२ जानेवारीस राजूने दीपालीला फोन करून, ‘आमच्या घरच्यांना आपले लग्न मान्य नाही. तू चिक्कोडीला ये, तेथे रजिस्टर लग्न करूया’ असे सांगितले. त्याच्यावर विश्वास ठेवून दीपाली २३ जानेवारीस आली.

राजूने दीपालीला साखरपुड्याचा विषय सांगितला. ही गोष्ट समजताच दीपालीने राजूबरोबर वाद घातला. ‘मला सोडून तू दुसऱ्या मुलीबरोबर लग्न कसे करू शकतोस? यावरून त्यांच्यात जोरदार वाद झाला. आपल्या लग्नात दीपाली अडचण ठरेल, या भीतीने राजूने तिला बाहेर नेले. जेवण झाल्यानंतर कोल्ड्रिंक्‍समध्ये विष मिसळले. कोल्ड्रिंक्‍स प्यायल्यानंतर दीपाली अत्यवस्थ झाली. राजूने स्वतः दीपालीला रुग्णालयात नेऊन उपचाराचे नाटक केले. उपचार सुरू असतानाच २४ जानेवारीस दीपालीचा मृत्यू झाला. त्यावेळी राजू आणि त्याचा मित्र सुरेश ढंग (रा. अंकली) तेथून फरारी झाले. हे प्रकरण रात्री उशिरा उघडकीस आले.

संपादन- अर्चना बनगे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: सोनं उच्चांकापासून 26 हजारांनी स्वस्त! पाहा ताजा भाव; पुढे सणासुदीच्या काळात सोनं महागणार की स्वस्त होणार?

MPSC Exam Success Story : शेतकरी बापाची लेक अन् आई पोलिसात! जाधववाडीच्या निकिताची MPSC मध्ये गगनभरारी, महसूल सहाय्यकपदी निवड

Caste Validity Certificate : जातवैधता प्रमाणपत्राचा आग्रह न धरता तात्पुरता प्रवेश द्या; उच्च न्यायालयाकडून अंतरिम दिलासा

Marathi News Live Updates : कोकणवासियांचा खोळंबा! मुंबई गोवा महामार्गावर वाहनांच्या रांगा, प्रचंड वाहतूक कोंडी

Rajendra Yadravkar : गोकुळ प्रचारावेळी यड्रावकरांच्या ताफ्याला सैनिक टाकळीत काळे झेंडे; प्रस्तावित एमआयडीसीविरोधात संताप, व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT