Youth gets stuck in the magical world of intoxication; Read detailed 
कोल्हापूर

तरुणाई अडकते नशेच्या जादूई दुनियेत ; वाचा सविस्तर 

राजेश मोरे

कोल्हापूर : बसण्यासाठी खास व्यवस्था, मंद लाईटस्‌ सोबत संगीताची जोड आणि काही क्षणातच नशेची जादूई दुनिया असा रेव्ह पार्टीचा फिल देऊन तरुणाईला अडकविण्याचा प्रयत्न हुक्का पार्लरद्वारे केला जात आहे. वेगवेगळे फ्लेवर आणि तासावर दराची आकारणी करत चालक गल्लेलठ्ठ बनताहेत. छुप्या बेकायदेशीर पार्लरवर कारवाईची मागणी पालकांतून होऊ लागली आहे. 

तरुणाई जगावेगळं आणि इतरांनी न केलेल्या गोष्टी करण्यात आघाडीवर असते. चित्रपटाप्रमाणे मित्रांसोबत पार्ट्यांचा आनंद घेण्याची नवी फॅशन रुजू लागली आहे. हॉटेल, लॉज, निवांतस्थळी, फॉर्म हाऊसवरील पार्ट्या नव्या राहिलेल्या नाहीत. तरुणाईतील कमकुवत बाजूचा फायदा उठविण्याचा अवैध धंदेवाल्यांनी प्रयत्न सुरू आहे. रेव्ह पार्टीसारखा फिल देत मित्रांसोबत ऐश करण्याची संधी बेकायदेशीर हुक्का पार्लरच्या माध्यमातून होत आहे. सहजा सहजी कोणाच्या निदर्शनास न येणारी जागा शोधायची. येथे निवांत अगर मित्र मैत्रिणीसोबत बसण्याची स्वतंत्र व आलिशान व्यवस्था उपलब्ध करून द्यायची. वेगवेगळ्या रंगांतील मंद प्रकाशाला संगीताची जोड द्यायची. अशा माहोलात मित्रमैत्रिणीसोबत हुक्का पिण्याची सोय करून द्यायची. हुक्‍क्‍याच्या वेगवेगळ्या फ्लेवर अगर तासानुसार किमान 500 रुपयांपासून पुढे दराची आकारणी करायची. त्याची एजंट अगर कामगाराच्या माध्यमातून छुप्या स्वरूपात जाहिरात करायची. त्यातून मोठी माया गोळा करण्याचे काम काही घटकांकडून होत आहे. 

पोलिस यंत्रणा दक्ष 
रेव्ह पार्टीचा फिल देणाऱ्या शाहूपुरीत हुक्का पार्लरवर शाहूपुरी पोलिसांनी काल छापा टाकला. यात मालक, कामगारासह हुक्का पिणाऱ्या 29 तरुणांवर पोलिसांनी रात्री कारवाई केली. अशा पद्धतीची कारवाई यापूर्वी पोलिसांनी उद्यमनगर, मोरेवाडी परिसरात केली होती. यातही तरुणाईवरच कारवाई केली होती. सध्या मटका, जुगार असे अवैध धंदे बंद असल्याने काळेधंदेवाल्यांकडून हुक्का पार्लरचा आधार घेतला जाण्याचे धोके वाढले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील पोलिस यंत्रणा सक्रिय झाली आहे. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Diesel Price: मोठा झटका! पेट्रोलनंतर डिझेलही महागलं; तब्बल २२ रुपयांनी वाढ, जाणून घ्या नवे दर...

प्रवाशांच्या सोयीसाठी मोठा निर्णय! मुंबई लोकलच्या 'या' रेल्वे स्टेशनवर 'स्लीपिंग पॉड्स' सुरू होणार; काही तासांसाठी आरामाची खात्री

देशमुखांच्या घरी असा साजरा होतो गुढी पाडवा; सुनबाई जिनिलियाने सांगितली परंपरा, म्हणाली, 'जेवणाला इतके पदार्थ...

Latest Marathi News Live Update :शेतकऱ्यांच्या हाता-तोंडाशी आलेला घास हिरावला, अवकाळी पावसामुळे द्राक्ष बागा भुईसपाट

अवकाळी पावसाचा करमाडला तडाखा; शेतकऱ्यांचा हाता तोंडाशी आलेला घास हिरावला

SCROLL FOR NEXT