Youth Help Stray Dogs Kolhapur Marathi News
Youth Help Stray Dogs Kolhapur Marathi News 
कोल्हापूर

भटक्‍या कुत्र्यांसाठी राबताहेत जीवरक्षाचे हात

सकाळवृत्तसेवा

कोल्हापूर ः लॉकडाउनमुळे शहरातील हॉटेल, खाऊ गल्या बंद असल्याने भटक्‍या कुत्र्यांच्या अन्नाचा प्रश्‍न निर्माण झाला. मात्र जीवरक्षा प्राणी संस्था आणि वृक्ष प्रेमी संस्थेच्या कार्यकर्त्यांनी त्यांना रोज अन्न देण्याचा उपक्रम सुरू केला आहे. बिस्किटे, चिकन, अंडी आणि भात यांचे मिश्रण देण्यात येते. भटक्‍या गायींना भाजांची देठे, चारा दिला जातो. या उपक्रमामुळे या मुक्‍या प्राण्यांना आधार मिळाला आहे. 

लॉकडाउनमुळे शहरातील जनजीवनच थांबले. हॉटेल बंद झाली, खाऊ गल्या बंद झाल्या. मंड्याही उठवल्या गेल्या. कोंडाळ्यांमध्ये कचऱ्याचे प्रमाण कमी झाले. या सर्वामुळे भटकी कुत्री, मोकाट गायींच्या जगण्याचा प्रश्‍न उभा राहिला. त्यांची ही दयनीय अवस्था लक्षात घेऊन जीवदया प्राणी संस्था आणि वृक्ष प्रेमी यांच्या कार्यकर्त्यांनी मुक्‍या प्राण्यांना अन्न देण्याचा उपक्रम हाती घेतला. यासाठी ते चिकनच्या दुकानातून उरलेले चिकन, अंडी गोळा करतात. भातामध्ये ते शिजवून मिक्‍स केले जाते. तसेच बिस्किट व बेकरीतील पावाचे तुकडे ही घेतात.

भाज्यांची उरलेली देठे, खराब फ्लॉवर गोळा केले जातात. हे सर्व साहित्य हॉटेल खेडूती येथे एकत्र केले जाते. तेथून रोज रात्री आठ वाजता कार्यकर्ते सहा टीम करून शहरातील विविध मार्गांवर जातात. उद्यमनगर, शाहूपुरी, लक्ष्मीपुरी, दसरा चौक, सुभाष रोड, महापालिका, शिवाजी पेठ, शुक्रवार पेठ, राजारामपुरी यांसह काही उपनगरांमध्ये कार्यकर्ते जातात.

येथील भटक्‍या कुत्र्यांना आणि गायींना अन्न दिले जाते. गायींनी चारा, भाज्यांची देठे दिली जातात. यामुळे या मुक्‍या जनावरांच्या जगण्याचा प्रश्‍न सुटला आहे. या उपक्रमात अमोल बुढ्ढे, कौशिक मोदी, अक्षय कांबळे, राजेश शिंदे, प्रमोद गुरव, शैलेश पोवार, प्रतीक चव्हाण, अभिजित वाकरेकर, चैतन्य निलकंठनावर यांच्यासह अन्य कार्यकर्तेही सहभागी आहेत. 

भूतदया ही भारतीय संस्कृती
लॉकडाउनमुळे भटकी कुत्री आणि मोकाट गायी यांच्यातर जगण्याचा प्रश्‍नच निर्माण झाला. भूतदया ही भारतीय संस्कृतिचे वैशिष्ट्य आहे. याच जाणिवेतून आम्ही हा उपक्रम हाती घेतला. यामुळे भटकी कुत्री, मोकाट गायी यांना आधार मिळाला. 
- अमोल बुढ्ढे, सामाजिक कार्यकर्ता 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election 2024: देशभरात तिसऱ्या टप्प्यात 61 टक्के, महाराष्ट्रात 54.09 टक्के मतदान

IPL 2024 DC vs RR Live Score: अभिषेक पोरेलचे आक्रमक अर्धशतक, दिल्लीच्या 120 धावा पार

राज्यसेवेला वर्णनात्मक पॅटर्न २०२५ पासूनच; बदल करण्याचा MPSCचा कुठलाही मानस नाही

Russia : पुतिन यांनी पाचव्यांदा घेतली रशियाच्या राष्ट्राध्यक्षपदाची शपथ; आता पेलावी लागणार 'ही' आव्हाने

Latest Marathi News Live Update : PDCC बँकेवर आचारसंहिता भंगप्रकरणी गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT