youth suicide case  narewadi gadhinglaj kolhapur
youth suicide case narewadi gadhinglaj kolhapur 
कोल्हापूर

वैफल्यग्रस्त प्रशांतने अखेर संपवले जिवनच

सकाळ वृत्तसेवा

गडहिंग्लज (कोल्हापूर)  : नरेवाडी (ता. गडहिंग्लज) येथील तरुणाचा मृतदेह आज सकाळी मंगाई नावच्या डोंगरात आढळला. प्रशांत प्रकाश मांगले (वय २२) असे त्याचे नाव आहे. दरम्यान, दारूच्या नशेत प्रशांतने गळफास घेतल्याची फिर्याद त्याच्या सख्ख्या भावाने दिली आहे.


पोलिसांनी सांगितले, प्रशांत दारूच्या आहारी गेला होता. त्याला मनासारखे काम मिळत नसल्याने मिळेल ती मजुरी करून त्यातून मिळणाऱ्या पैशातून तो दारू पित असे. २९ ऑक्‍टोबरला मुंबई येथे कामासाठी जात असल्याचे भाऊ सुशांत व आईला सांगून तो घराबाहेर पडला. त्यानंतरही तो नेहमी दारूच्या नशेत राहिला. त्यातूनच मनासारखे काम मिळत नसल्याने तो अधिकच वैफल्यग्रस्त झाला होता. दरम्यान, आज सकाळी दहाच्या सुमारास नरेवाडीच्या मंगाई डोंगरात गळफास घेतल्याचा मृतदेह आढळला. याची माहिती मिळताच प्रशांतच्या नातेवाईकांनी ओळख पटवण्यासाठी घटनास्थळी गेले. त्यावेळी मृतदेह प्रशांतचाच असल्याचे निष्पन्न झाले. मृत प्रशांतचा भाऊ सुशांत याने  फिर्याद दिली आहे.

जनावरे शोधताना...
मांगले कुटुंबीय प्रशांत मुंबईलाच गेल्याच्या मानसिकतेत होते. आज तुप्पूरवाडीतील एकाची जनावरे गायब झाली होती. ती शोधण्यासाठी काही लोक मंगाई डोंगर परिसरात गेले होते. त्यावेळी प्रशांत गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला. संपूर्ण मृतदेह कुजून दुर्गंधी सुटलेली होती. म्हणून जागेवरच शवविच्छेदन केल्याचे सांगण्यात आले.

संपादन- अर्चना बनगे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MI vs KKR : शाहरूख... वानखेडे... केकेआर! अखेर 12 वर्षानंतर संपला विजयाचा दुष्काळ

MSC Aries Ship : इराणने जप्त केलेल्या कार्गो शिपमधील क्रू मेंबर्सची सुटका; 16 भारतीयांचा समावेश

RCB vs GT : गुजरातला प्ले ऑफसाठी विजय गरजेचा, आरसीबी टाकणार का मिठाचा खडा

PM Modi : ''हिंदूंना दुसऱ्या दर्जाचे नागरिक करण्याचा डाव'', पंतप्रधान मोदींची तृणमूल काँग्रेसवर टीका

MI vs KKR IPL 2024 : सूर्यकुमार लढला मात्र केकेआरनं एका तपानंतर वानखेडेवर विजय केला साजरा

SCROLL FOR NEXT