Youthful planning for the Valentine celebration Valentine day marathi news 
कोल्हापूर

‘व्हॅलेंटाइन फीवर’:बाजारात  आलीय ही ‘रोमँटिक’धून 

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर :  काय आवडत असेल ‘तिला’ अन्‌ ‘त्याला?’ कोणती वस्तू घेऊ?.... मनाला सुखावणाऱ्या भावनांबरोबरच वाटणारी थोडीशी धडधड सांभाळत अनेकांनी आपल्या ‘व्हॅलेंटाइन’ला भेट देण्यासाठी आज भेटवस्तूंच्या दुकानांत गर्दी केली आहे. रोमँटिक स्वर गुंफणारी शुभेच्छापत्रे, लव्ह टेडी बेअर्स, लव्ह बर्डस्‌ तसेच गुलाबी ते लाल रंगाच्या विविध छटांनी सजलेल्या घड्याळांनी  बाजारपेठा फुलल्या होत्या. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवरही आपल्या प्रेमासोबत व्हॅलेंटाइन डे साजरा करायला तरुणाई तयारीला लागली आहे.


प्रेमाचा दिवस म्हणजे व्हॅलेंटाइन डे. प्रियकर-प्रेयसीच नव्हे, सर्वच जण या दिवशी आपल्या भावना व्यक्त करताना दिसतात. त्यांच्यासाठी विविध वस्तूंनी ‘व्हॅलेंटाइन डे’निमित्ताने बाजारपेठा फुलल्या आहेत.  बाजारात विविधरंगी शुभेच्छापत्रे आली आहेत. तरुणाईचा मराठी शुभेच्छापत्रांकडे मोठा ओढा असल्याचे शुभेच्छापत्र विक्रेत्यांनी सांगितले.

यंदा संगीतमय शुभेच्छापत्रांचीही मोठी चलती असून, शुभेच्छापत्रांची घडी उलगडताच ‘रोमँटिक’ धून ऐकवणारी शुभेच्छापत्रे तरुणांच्या मनाला भावत आहेत. याशिवाय ‘लव्ह टेडी बेअर्स’, ‘लव्ह बर्डस्‌’, ‘लव्ह स्टिक्‍स हार्ट’, ‘लव्ह रिंग पॉकेट’ सुंदर टेडी बेअर हातात घेतल्यावर ऐकू येणारी धून, ‘आपल्या’ व्यक्तीचे छायाचित्र तितक्‍याच नाजूकतेने जपण्यासाठी असलेल्या विविध आकारांतील फ्रेम, हृदयाचा आकार असलेली घड्याळे, हार्ट शेप फुगे, की चेन अशा नानाविध वस्तूंमुळे बाजाराला ‘व्हॅलेंटाइन फीवर’ आला आहे. २५ रुपयांपासून अडीच हजार रुपयांपर्यंतच्या विविध भेटवस्तू बाजारात विक्रीस उपलब्ध झाल्या आहेत.

चॉकलेट, भेटकार्ड, सॉफ्ट टॉइज, सोनेरी आणि खड्यांच्या भेटवस्तू सर्वांचे लक्ष वेधून घेत आहेत. अद्यापही बाजारपेठेत चायना माल आहे. सध्या ‘व्हॅलेंटाइन डे’ ही संकल्पना फक्त प्रियकर-प्रेयसीपुरती मर्यादित राहिलेली नसून, मित्रपरिवार आणि कुटुंबीयांमध्येही प्रचलित आहे. याचाच विचार करून कंपन्यांनी नवी उत्पादने बाजारात आणली आहेत.’
-शहाजी पवार, भेटवस्तू विक्रेते

संपादन - अर्चना बनगे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Elderly Woman Property Fraud: ‘ज्येष्ठ महिलेला न्यायासाठी वणवण फिरवू नका!’ ; मुंबई उच्च न्यायालयाकडून पोलिसांना तपासाचा आदेश

Government Job Fraud: सरकारी नोकरीचे आमिष दाखवून सुशिक्षित बेरोजगार तरुणाची २० लाखांची फसवणूक

''...तर मी जीव देईन'' २०१२ मध्ये निवडणुकीपूर्वी मनमोहन सिंग असं का म्हणाले होते? माजी निवडणूक आयुक्तांकडून धक्कादायक खुलासा

संस्कृतच्या विद्यार्थ्यांना दहावीनंतर होता येणार डॉक्टर! साडेसात वर्षांचा नवा अभ्यासक्रम, संस्कृत विद्यापीठाचा निर्णय

Maharashtra Saint Tradition: संत आणि वारीमुळेच महाराष्ट्राची अस्मिता टिकली; सकाळच्या व्याख्यानमालेत डॉ. सदानंद मोरे यांचे प्रतिपादन

SCROLL FOR NEXT