Zero Mortality In The Age Group Of 30 To Zero In Ajara Kolhapur Marathi News 
कोल्हापूर

आजऱ्यात शून्य ते 30 वयोगटांत मृत्यूचे प्रमाण शून्य

रणजित कालेकर

आजरा : कोरोनामुळे आजरा तालुक्‍यात आतापर्यंत 26 जणांचा बळी गेला. यामध्ये वयोवृद्ध गटात मृत्यूचे प्रमाण अधिक आहे. यात आजरा शहरातील 9 रुग्ण दगावले असून गेल्या पंधरा दिवसांत 13 जणांचा बळी गेल्याने मृत्यू दरात वाढ झाली. दिलासादायक बाब म्हणजे शून्य ते तीस वयोगटांत कोणाचाही मृत्यू झालेला नाही. या पंचवीस मृत्यूमध्ये बेळगाव येथील दोघांचा समावेशही तालुक्‍याच्या यादीत केला गेला आहे.

तालुक्‍यात कोरोनाग्रस्तांची संख्या हजाराकडे वाटचाल करीत आहे. सुरवातीच्या काळात रुग्ण आढळत असताना मृत्यूचे प्रमाण नव्हते; मात्र गेल्या पंधरा दिवसांत दिवसाला सरासरी एक मृत्यू झाला. एकूण पंचवीस मृत्यूपैकी 51 ते 55 या वयोगटांत पाच जणांचा, तर 66 ते 70 या वयोगटांत सहा जणांचा मृत्यू झाला. 71 ते 75 वयोगटांत 4, 56 ते 60 वयोगटांत 3 व्यक्तींचा मृत्यू झाला.

31 ते 35 व 41 ते 45 वयोगटांत प्रत्येकी 2 जणांचा मृत्यू झाला. 36 ते 40, 46 ते 50, 61 ते 65 व 76 ते 80 या चार वयोगटांत प्रत्येकी एकाचा मृत्यू झाला. झालेल्या एकूण मृत्यूपैकी आजरा शहरात सर्वाधिक 9 मृत्यू झाले आहेत. यांतील दोन मृत्यू आजरा शहराशी संबंधित बेळगाव येथील आहेत, तर मेंढोली, वडकशिवाले, हांदेवाडी, सोहाळे, खोराटवाडी, वाटंगी, साळगाव, शृंगारवाडी, होनेवाडी, झुलपेवाडी, गवसे, हारूर, सरोळी, कोळींद्रे व मुमेवाडी या गावांतील प्रत्येकी एका व्यक्तीचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. 

तालुक्‍याचा मृत्यू दर 3.35 टक्के 
आजरा तालुक्‍यात आतापर्यंत एकूण 776 कोरोनाबाधित आढळले आहेत. यांपैकी 26 जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोनाबाधितांच्या संख्येशी मृत्यूचे प्रमाण 3.35 इतके आहे. गत पंधरा दिवसांत मृत्यू पावणाऱ्यांची संख्या दुप्पट झाली आहे. देश व राज्याचा विचार करता तालुक्‍यातील मृत्यूचे प्रमाण जास्त आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC Paper Leak : एमपीएससी पेपरफुटी प्रकरणावरून संभाजी ब्रिगेड आक्रमक; सचिवांच्या तोंडाला काळे फासले, अध्यक्षांनाही इशारा

Maratha Reservation: मनाेज जरांगे यांच्या उपोषणाचा १४वा दिवस; अभिजित दिपकेंचा सरकारवर निशाणा, ‘चर्चेसाठी पुढे या’

Numerology: 'या' जन्मतारखांच्या लोकांवर असते बुध-शुक्राची कृपा; कमी मेहनतीत मिळवतात मोठे यश!

Latest Marathi News Live Update : MPSC पेपरफुटीप्रकरणी शिक्षणमंत्र्यांना दोष देणे चुकीचे; राजीनामा नव्हे, सिस्टीम बदलण्याची गरज : योगेश कदम

Rabid Dog Attack: पिसाळलेल्या कुत्र्याने आळे गावात उडवली खळबळ; नऊ जणांना चावा, अनेकांना रुग्णालयात हलविले

SCROLL FOR NEXT