कोल्हापूर

राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या गोकुळ दूध संघात 10 उमेदवारांचा बोलबाला

दोन्ही बाजुकडून एक,दोन नव्हे तर जवळपास 10 उमेदवार हे जिल्हा परिषदेशी संबंधित

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर :जिल्ह्यासह राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीत जिल्हा परिषदेचा मोठा बोलबाला आहे. कारण दोन्हीही पॅनेलमध्ये जिल्हा परिषदेचे आजी, माजी सदस्य, किंवा सदस्याचे पती उमेदवार म्हणून रिंगणात आहेत. दोन्ही बाजुकडून एक,दोन नव्हे तर जवळपास 10 उमेदवार हे जिल्हा परिषदेशी संबंधित आहेत. महत्वाचे म्हणजे एक माजी अध्यक्ष आणि तीन उमेदवार हे जिल्हा परिषदेचे शिक्षण सभापती राहिले आहेत.

जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा व विद्यमान सदस्या शौमिका महाडिक यांना सत्ताधारी गटाने उमेदवारी दिली आहे. याच पॅनेलमधून जिल्हा परिषदेचे माजी शिक्षण सभापती राहिलेल्या बाळासाहेब खाडे व आंबरिष घाटगे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर विरोधी आघाडीनेही माजी शिक्षण सभापती अभिजित तायशेटे व माजी सभापती अमरसिंह पाटील यांना संधी दिली असल्याने एकूण चार माजी शिक्षण समिती सभापती गोकुळच्या रिंगणात उतरले आहेत.

विरोधी आघाडीतून कर्णसिंह गायकवाड हे निवडणूक लढवत आहेत. त्यांच्या पत्नी भाग्यश्री गायकवाड यांनी महिला व बालकल्याण समिती सभापती म्हणून काम केले आहे. तर त्यांचे बंधू योगिराज गायकवाड यांनीही जिल्हा परिषद सदस्य म्हणून काम केले आहे. अंजना रेडेकर यांनीही जिल्हा परिषद सदस्य म्हणून काम केले आहे. सत्ताधारी आघाडीचे दीपक पाटील यांच्या पत्नी ज्योती पाटील तर धैर्यशील देसाई यांचे भाउ राहूल देसाई यांनी सदस्य म्हणून काम केले आहे. तर त्यांच्या भावजय या सध्याच्या सभागृहात सदस्या आहेत. सदानंद हत्तरकी यांच्या मातोश्री या विद्यमान सभागृहाच्या सदस्या आहेत. सत्ताधारी आघाडीचे उमेदवार राजाराम भाटळे यांच्या पत्नीही सध्या जिल्हा परिषद सदस्या म्हणून काम करत आहेत.

Edited By- Archana Banage

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar on Vidyanand Bapat: “विद्यानंद बापटांची भूमिका योग्य”; डीजे वादावर शरद पवारांचं मोठं वक्तव्य, हल्लेखोरांनाही सुनावलं

715 Crore Jaigad Tawsal Bridge : मुंबईच्या 'सी लिंक'सारखा कोकणात उभा राहतोय 715 कोटींचा केबल पूल; जयगड खाडीवरून अनुभवता येणार निसर्गरम्य सूर्यास्त

Marathi News Live Updates : नेपाळमध्ये महापुराचा कहर! ६०० मुलांसह ४,७०० हून अधिक जण बेपत्ता; मृतांचा आकडा १,२८२ वर

Solapur Crime: साेलापूरात माजी नगरसेवक वाधवाणींवर हल्ला; २५ वर्षांपूर्वी पत्नीसोबत घटस्फोट, नातेवाइकानेच केले वार

FDA Action: भेसळीवर 'एफडीए'ची नजर! सर्व सण-उत्सवांसाठी एकच कायमस्वरूपी स्थायी आदेश

SCROLL FOR NEXT