zilla parishad member nimbalkar accused on corona kit rupees 88 crore in kolhapur 
कोल्हापूर

कोविड खरेदीची कॅगमार्फत चौकशी करा ; कोल्हापूर जिल्हा परिषदेत सदस्यांची मागणी

सदानंद पाटील

कोल्हापूर : कोरोना काळात झालेल्या कोविड खरेदीची कॅगमार्फत चौकशी करावी, अशी मागणी जिल्हा परिषद सदस्य राजवर्धन निंबाळकर यांनी केली. आतापर्यंत 88 कोटी रुपयांची खरेदी झाली असून यात ३५ कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला. कोरोना खरेदी होत असताना प्रमुख अधिकाऱ्यांच्या सह्या नाहीत.

केवळ खरेदी समितीचे तत्कालीन अध्यक्ष आणि राष्ट्रीय ग्रामीण विभागातील कंत्राटी कर्मचारी यांच्या सह्यांवर ही खरेदी झाली आहे. यामध्ये पीपीई कीट 22 कोटी, मास्क ९ कोटी, सनिटाइजर ११ कोटी, थर्मल स्कॅनर आणि प्लस ऑक्सीमिटर 4 कोटी 50 लाख, बेड 5 कोटी, व्हेंटिलेटर 3 कोटी 50 लाख, सिलेंडर 8 कोटी अशी खरेदी झाली आहे. 

औरंगाबादच्या खरेदीचे लेखापरीक्षण झाले असून विभागातून विविध माहिती प्राप्त झाली आहे. या माहितीच्या आधारे खरेदीतील अनेक गैरप्रकार उघड झाले आहेत. काही राजकीय मंडळींच्या आशीर्वादाने यामध्ये गडबड झाल्याचा आरोपही निंबाळकर यांनी केला. काही मंत्र्यांचे इचलकरंजी परिसरातील नातेवाईक तसेच कोल्हापूर परिसरातील राजकीय नेत्यांचे संबंधित लोकांनी अनेक प्रकारचे साहित्य पुरवले असल्याचेही त्यांनी या पत्रकार परिषदेत सांगितले. पत्रकार परिषदेस भगवान काटे भाजपचे सरचिटणीस विठ्ठल पाटील उपस्थित होते. 

संपादन - स्नेहल कदम 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मोठी बातमी! ३३ जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात आज जमा होणार अतिवृष्टी, महापुराची नुकसान भरपाई; सर्व जिल्ह्यांचे पंचनामे अहवाल सादर

Prashant Kishor on Bihar Election: अखेर प्रशांत किशोर यांनी निवडणूक न लढवण्यामागचं नेमकं कारण सांगितलं, म्हणाले..

पोलिस आयुक्तांचा मोठा निर्णय! सोलापूर शहरात रात्री १२ ते पहाटे ५ पर्यंत नाकाबंदी; प्रत्येक पोलिस ठाण्याअंतर्गत एक विशेष पथक

Baidpura Violence : गोमांस विक्रीच्या संशयावरून दोन गट आमनेसामने; दोन्ही गटाकडून तक्रारी, अदखलप्राप्त गुन्हे दाखल

Pune Traffic : पुणे-सातारा बाह्यवळण मार्गावर दिवाळीच्या गर्दीत वाहतूक कोंडीचा कहर

SCROLL FOR NEXT