villagers celebrates victory 
पश्चिम महाराष्ट्र

आदिवासी पाड्यात घडला "महाराष्ट्र केसरी'

सकाळ वृत्तसेवा

नगर : अकोल्यासारख्या आदिवासी तालुक्‍यातून यंदाचा महाराष्ट्र केसरी म्हणजेच हर्षवर्धन सदगीर घडला आहे. मूळ कोंभाळणे येथील तालमीतूनच त्याने कुस्तीचे धडे गिरवले. आजोबा किसन सदगीर व आईचे वडील कोंडाजी ढोमनर यांच्याकडून त्याला हा कुस्तीचा वारसा मिळाला आहे. 

सदगीरची कुस्ती पाहण्यासाठी निम्मे कोंभाळणे आज पुण्यातील बालेवाडी संकुलात गेले होते. आपल्या गावाच्या आखाड्यातील मल्लाने आज महाराष्ट्राचे मैदान मारल्याचे पाहून गावकऱ्यांचा ऊर आनंदाने भरून आला. हर्षवर्धनने गदा पटकावल्याची माहिती मिळताच गावकऱ्यांनी फटाके फोडून जल्लोष केला. हर्षवर्धनचे वडील हे टाहाकारी शाळेत लॅब असिस्टंट आहेत, तर आई गृहिणी आहे. भाऊ स्पर्धा परीक्षेची तयारी करीत आहे. 

कोंभाळण्यात कुस्तीची परंपरा कायम

हर्षवर्धनचे बालपण कोंभाळणे गावातच गेले. या परिसरातील गावांत आजही आखाडे भरतात. त्यातून कुस्तीची परंपरा जपली जाते. त्याच आखाड्यातून हर्षवर्धनही पुढे आला. महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत त्याने नाशिक विभागातून प्रतिनिधित्व केले. काका पवारांकडे जाण्यापूर्वी तो भगूरला तालमीत होता. त्यामुळे तो नाशिकचा असल्याचा शिक्का बसला. परंतु तो नगर जिल्ह्यातील अकोले तालुक्‍यातील मल्ल आहे. 

ग्रामस्थांकडून प्रोत्साहन

सोमवारी (ता.6) स्पर्धेच्या उपांन्तपूर्व फेरीत हर्षवर्धन याने गतविजेता अभिषेक कटके याचा पराभव केला होता. त्यामुळे त्याचा आजचा अंतिम सामना पाहण्यासाठी कोंभाळणे गावातून मोठ्या संख्येने ग्रामस्थ पुण्याला गेले होते. उपसरपंच गोविंद सदगीर यांच्यासह, हर्षवर्धनचे काका राजेंद्र सदगीर, आजोबा कोंडाजी ढोन्नर, किसन सदगीर, ग्रामपंचायत सदस्य आनंदा सदगीर, मधुकर बिन्नर, बाळासाहेब सदगीर, संतोष सदगीर, महेश सदगीर, सीताराम बेनके आदी स्पर्धेच्या ठिकाणी उपस्थित होते. हर्षवर्धनला प्रोत्साहन देत होते. त्याचे मनोबळ वाढवित होते. नगरच्या योगेश पवार, कर्जतचा संतोष गायकवाड, केवल भिंगारे यांनी वेगवेगळ्या गटांत बक्षीस मिळवले. यापूर्वी अशोक शिर्के, गुलाब बर्डे यांनी महाराष्ट्र केसरी किताब पटकावला आहे. 

आर्मीतून परतल्यानंतर मिळवले यश

हर्षवर्धन सैन्यात भरती झाला होता. परंतु त्याला कुस्तीचा छंद स्वस्थ बसू देत नव्हता. त्यामुळे त्याने आर्मीतून येत दोन वर्षे कसून सराव केला. भूगाव येथील अधिवेशनात त्याने 92 किलो वजनगटात सुवर्णपदक घेतले होते. तो ग्रीको रोमन कुस्ती प्रकारात माहीर आहे. त्याने गेल्या वर्षीचा महाराष्ट्र केसरी अभिजित कटकेला नमवित सर्वांचे लक्ष वेधले. 

गावाचा सन्मान वाढला 
हर्षवर्धन सदगीर याला महाराष्ट्र केसरी होण्याची पहिल्यापासून इच्छा होती. त्यासाठी त्याने जोरदार परिश्रम घेतले. गावाचा व समाजाचा सन्मान त्याने वाढविला. 
- गोविंद सदगीर, उपसरपंच, कोंभाळणे 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ganeshotsav 2025: मोफत बस गणेशभक्तांसाठी की मतांसाठी? राजकीय स्पर्धा पेटली, राजकारण्यांमध्ये चढाओढ

Mumbai News: मुंबई पोलिसांची हद्द आता कोकणापर्यंत! पोलिस ठाणे उभे राहणार, कधी आणि कुठे? वाचा...

CM Devendra Fadnavis: राज्यातील ३,५०० गावे ‘इंटेलिजंट’ करणार: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; नागपुरातील सातनवरी येथे पहिला प्रयोग

Manoj Jarange-Patil: मराठा आरक्षण मिळवल्याशिवाय परतणार नाही: मनोज जरांगे-पाटील; प्रश्न निकाली न लागल्यास इतिहास घडवणार

Nikki Bhati Murder Case : महिलेबरोबर फिरताना पकडला गेला होता विपीन भाटी, तेव्हा....; निक्की हत्याकांड प्रकरणात मोठा खुलासा!

SCROLL FOR NEXT