Krishna factory's target for 12 Million tons this year 
पश्चिम महाराष्ट्र

"कृष्णा' कारखान्याचे यंदा इतक्या टनांचे उद्दीष्ट;  मिल रोलरचे झाले पूजन

सकाळवृत्तसेवा

इस्लामपूर (जि. सांगली) : यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याने सन 2020-21 या आगामी गळीत हंगामासाठी 12 लाख मेट्रीक टन ऊस गाळपाचे उद्दीष्ट ठेवले आहे, असे प्रतिपादन अध्यक्ष डॉ. सुरेश भोसले यांनी केले. 

कारखान्यात 2020-21 या गळीत हंगामासाठी मिल रोलरचे पूजन डॉ. सुरेश भोसले व उपाध्यक्ष जगदीश जगताप यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. संचालक दयानंद पाटील, संजय पाटील, धोंडीराम जाधव, अमोल गुरव, दिलीपराव पाटील, ब्रिजराज मोहिते, पांडूरंग होनमाने, सुजित मोरे, कार्यकारी संचालक सूर्यकांत दळवी, मनोज पाटील, एम. के. कापूरकर, बाळासाहेब पाटील प्रमुख उपस्थित होते. 

डॉ. सुरेश भोसले म्हणाले, ""शासनाने 15 ऑक्‍टोबरपासून गळीत हंगामास परवानगी दिली असून, त्यादृष्टीने कृष्णा कारखान्यात ऑफ सिझनमधील ओव्हर ऑईलिंगची कामे गतीने सुरू आहेत. त्याचबरोबर तोडणी वाहतूकीचे करारही अंतिम टप्प्यात आले आहेत. येणाऱ्या गळीत हंगामात मोठ्या प्रमाणात ऊसाची उपलब्धता असणार आहे. यासाठी सभासद शेतकरी बांधवांनी लवकरात लवकर आपल्या ऊसाची नोंद कृष्णा कारखान्याकडे करावी.''

डॉ. सुरेश भोसले व जगदीश जगताप यांच्या हस्ते धार्मिक विधी करून रोलरचे पूजन करण्यात आले. यांत्रीक कळ दाबून रोलर बसवण्याच्या कामास प्रारंभ करण्यात आला. पी. डी. राक्षे, सुहास घोरपडे, डी. जी. देसाई, प्रतापसिंह नलवडे, गिरीष इस्लामपूरकर, अरुण पाटील, आर. जे. पाटील, रविंद्र देशमुख, कार्यालयीन अधिक्षक नीलेश देशमुख, जी. बी. मोहिते उपस्थित होते. सोशल डिन्स्टसिंगचे पालन करुन कार्यक्रम झाला. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

EPFO Wage Limit Hike : कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज! ईपीएफओची वेतन मर्यादा वाढली; ५१ लाखांहून अधिक जणांना फायदा

Satara Crime : साताऱ्यात दोन गटात हाणामारी, तणावाचे वातावरण; शेवटी २ मंडळांचे केले गणेश विसर्जन, १४ जणांवर गुन्हा दाखल

Team India Update: वरुण चक्रवर्तीच्या जागी आशियाई स्पर्धेसाठी DC चा ऑल राऊंडर; IND vs WI मालिकेत हार्दिक पांड्याचे खेळणे अवघड

मुंबई-नाशिक हायवेवर अपघात, एकाच कुटुंबातल्या चौघांचा मृत्यू, देवदर्शनाहून परतताना २ वर्षांपूर्वी जळालेल्या ट्रकला गाडीची धडक

Marathi News Live Updates : यमुना नदी आणि इतर जलस्रोतांमध्ये मूर्ती विसर्जनास मनाई

SCROLL FOR NEXT