पश्चिम महाराष्ट्र

कृष्णेचा महापुर ओसरायला सुरवात; 4 फुट पाणी उतरले

कृष्णा नदीचा महापूर ओसरायला सुरवात, कोयना धरणातून विसर्ग कमी केला आहे.

सकाळ डिजिटल टीम

सांगली : कृष्णा नदीचा (krishna river flood) महापूर उतरायला सुरवात झाली आहे. (sangli rain update) कराड येथे पाणी चार फुटांनी उतरले आहे. सांगलीत सायंकाळी पाचनंतर पाणी पातळी उतरायला सुरवात होईल. तोवर सांगलीत पातळी 51 ते 52 फुटापर्यंत पोहचू शकते. महापुर आता नियंत्रणाखाली येत आहे, उद्या सकाळपर्यंत पाणी गतीने पात्राकडे सरकलेले असेल, असे पाटबंधारेचे मुख्य अभियंता हनुमंत गुणाले यांनी 'सकाळ'शी बोलताना सांगितले. (sangli) ते म्हणाले, कृष्णा नदीचा महापूर ओसरायला सुरवात झाली आहे. कोयना धरणातून विसर्ग कमी केला आहे. पाऊसही थांबला आहे. (heavy rain) कराडमधे पाणी चार फुटाने उतरले आहे, भिलवडीत उतार लागला आहे. सांगलीत चारनंतर परिणाम दिसून येईल."

दरम्यान, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार या परिस्थितीवर स्वतः लक्ष ठेवून आहेत. पाटबंधारे विभागाच्या प्रमुख अधिकाऱ्यांसोबत सध्या ते चर्चा करत असून कृष्णा नदीचे पाणी वाढू नये यासाठी कोणत्या उपाययोजना करता येतील याबाबत विचारविनिमय सुरू आहे. कृष्णा नदीला महापूर आला असून सांगलीत कृष्णा नदीची पाणीपातळी आयर्विन पुलाजवळ पन्नास फुटांवर पोहोचली आहे. सन 2019 ला पाणीपातळी 57 फुटांपर्यंत पोचली होती. तशीच परिस्थिती पुन्हा येईल का? अशी भीती सांगलीकरांच्या मनात आहे. त्यामुळे लोकांचे गतीने स्थलांतर केले जात आहे.

कर्नाटकातील अलमट्टी धरणातून पाण्याचा विसर्ग साडेतीन लाखाच्या घरात सुरू आहे. या संपूर्ण स्थितीचा आढावा घेण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार हे जलसंपदा विभागातील अधिकाऱ्यांशी चर्चा करत आहेत. परिस्थिती नियंत्रणाखाली रहावी यासाठी आवश्यक उपाययोजना, कर्नाटक राज्याशी सतत समन्वय आणि लोकांची सुरक्षा या विषयावर राज्य शासनाने स्पष्ट सूचना दिल्या असून त्या हालचालींचा आढावाही ते घेत असल्याचे सांगण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IIT Bombay Student Endlife : साहिल वाकोडे प्रकरण : तीन दिवसांच्या आंदोलनानंतर आयआयटी बॉम्बे झुकले; विद्यार्थ्यांच्या १८ मागण्या केल्या मान्य

Pune Metro: आयटी कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! हिंजवडी मेट्रो स्थानकांना कंपन्यांची कार्यालये थेट जोडणार; पादचारी पुलांची तयारी

रागात पाहिल्याने छातीवर सपासप वार..., मुंबईत गणेशोत्सवात रक्तरंजित थरार; 7 जणांकडून मंडळाच्या अध्यक्षाची हत्या

World Alzheimer Day 2026: साठी ओलांडलीय? मग अल्झायमरची ‘ही’ लक्षणं तुम्हाला माहित असायलाच हवीत!

Marathi News Live Updates : येत्या महिनाभरात मुंबई महानगरपालिकेच्या 800 अभियंत्यांची होणार उचलबांगडी, काय आहे कारण?

SCROLL FOR NEXT