Kupwad's waist tightened; Recovered Rs 3 crore in a month 
पश्चिम महाराष्ट्र

कुपवाडला कंबर कसली; महिनाभरात 3 कोटी घरपट्टीवर वसुली 

हृषीकेश माने

कुपवाड : महापालिकेच्या मालमत्ता कर निर्धारण व संकलन विभागाने कुपवाड भागातील घरपट्टी वसुलीसाठी गेली महिनाभर कंबर कसली आहे. मालमत्ता करात दंड/शास्ती माफीसाठी अमलात आणलेल्या अभय योजनेंतर्गत 15 मार्च 21 अखेर 3 कोटी 38 लाख रकमेची वसुली कुपवाड कर निर्धारण व संकलन विभागाच्या तर्फे करण्यात आली. 

कुपवाड महापालिका क्षेत्रामध्ये नोंदणीकृत घरपट्टी धारकांची संख्या 26027 इतकी आहे. कर निर्धारण व संकलन विभागाच्या वतीने दर वर्षी 70 ते 80 टक्के वसुली केली जाते. न्यायालयीन बाब आणि पडक्‍या इमारतींच्या मालमत्तेपोटी उर्वरित 20 ते 30 टक्के वसुली प्रलंबित राहते, अशी माहिती कर निरीक्षक गणी सय्यद यांनी दिली. 

अभय योजने बद्दल सय्यद म्हणाले,""महापालिकेच्या अभय योजनेद्वारे नागरिकांना दिलासा मिळाला आहे. योजनेचा कालखंड 15 फेब्रुवारी ते 31 मार्च असा असून याद्वारे दंड, व्याजामध्ये 100 टक्के माफी दिली जाणार आहे. संपूर्ण कुपवाड परिक्षेत्रात जनजागृतीचे काम सुरू केले आहे. वसुलीच्या भरण्यासाठी एका फिरत्या पथकाची नियुक्ती केली आहे. यंदावर्षी 9 कोटी 34 इतके वसुलीचे उद्दिष्ट असून आत्तापर्यंत 3 कोटी 38 लाख इतकी वसुली झाली आहे. उद्दिष्टपूर्तीची उर्वरित रक्कम येत्या 31 मार्च अखेर निश्‍चित स्वरूपात वसूल होईल. 

"उपयोगकर्ता' साठी अडवणूक नाही. 
उपयोगकर्ता कर आकारणीबाबत बोलताना कर निरीक्षक गणी सय्यद म्हणाले, ""अभय योजनेतील दंड, व्याजाच्या माफीची सवलत ही उपयोगकर्ता शुल्कासह घरपट्टी भरणाऱ्यांसाठी आहे. योग्य पद्धतीने पटवून दिल्यास मालमत्ता धारक शुल्क भरतो. मात्र ज्यांची अडचण आहे त्यांना कोणतीही सक्ती केली जात नाही. उपलब्ध असेल तितकी रक्कम आम्ही स्वीकारतो. उपयोगकर्ता शुल्कासाठी कोणाचीही अडवणूक करत नाही. 

थकितांना व्यक्तिगत नोटिसा 
थकीत शुल्क असणाऱ्या मालमत्ता धारकांना व्यक्तिगत नोटिसा बजावण्याचे काम कर निर्धारण व संकलन विभाग यांच्याकडून सुरू आहे. यामध्ये एकूण मागणी, अभय योजनेंतर्गत दंड व्याजातील माफी, प्रत्यक्षात अदा करावयाची रक्कम असा सर्व तपशील नमूद करण्यात आला आहे. 

संपादन : प्रफुल्ल सुतार 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पुण्यात संतापजनक प्रकार! १०वीत चांगले मार्क मिळवून देण्याच्या नावाखाली भोंदू बाबाकडून अल्पवयीन मुलीचं लैंगिक शोषण

AUS vs BAN : ऐ, निघ इथून! मिचल स्टार्क अन् मेहिदी हसन मिराझ यांच्यात शाब्दिक खडाजंगी; बांगलादेशच्या हल्ल्याने कांगारू बिथरले Video

पप्पा, मुलांची आणि तुमची भेट व्हायला हवी होती... सासरे विलासराव देशमुख यांच्यासाठी जिनिलियाची खास पोस्ट; म्हणाली- तुम्ही...

आफ्रिकेत Business करायचाय? दक्षिण आफ्रिकेच्या Consul General नी सांगितला ‘गेटवे’ फॉर्म्युला

Marathi Language: मोठी बातमी! रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी शिकण्यासाठी मुदतवाढ, राज्य सरकारचा निर्णय

SCROLL FOR NEXT