2Corona_25 
पश्चिम महाराष्ट्र

मिरजेतील प्रयोगशाळेची चाचणी सुरु 

सकाळवृत्तसेवा

सांगली : कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर मिरज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथे सुरु करण्यात येणाऱ्या प्रयोगशाळेची सर्व मशनरी उपलब्ध झाल्या आहेत. त्याची आज चाचणी घेण्यात येत आहेत. येत्या दोन दिवसात प्रयोगशाळा पुर्ण क्षमतेने कार्यरत होतील, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांनी आज दिली. ते म्हणाले, अफवांवर विश्वास ठेवू नका. सद्यस्थितीत 25 कोरोना बाधित असून सर्वांची प्रकृती स्वस्थ आहे. रुग्ण संख्येत वाढ झालेली नाही. 

कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्‍वभूमीवर मिरज येथे कोरोना तपासणी प्रयोगशाळा सुरू करण्याची घोषणा शासनाने केली होती. ती प्रयोगशाळा सुरू करण्यासाठी आवश्‍यक ती सर्व साधनसामग्री दाखल झाली आहे. यामुळे सांगलीसह कोल्हापूर, सातारा, रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील संशयित रुग्णांच्या "स्वॅप'चे नमुने तपासणीला गती मिळणार आहे. सध्या या संपूर्ण परिसरातील संशयितांचे स्वॅपचे नमुने तपासणीसाठी पुण्याला पाठवावे लागतात. त्याचा अहवाल यायला किमान दोन दिवस लागतात. त्यामुळे संशयित रुग्णांना उपचार करण्यास विलंब लागत होता.

या प्रयोगशाळेमुळे संशयित दाखल रुग्णांची तातडीने तपासणी होऊन त्यांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले तर त्यांना सोडून देता येणार आहे. मिरज शासकीय रुग्णालयात सध्या कोरोना बाधीत 25 रुग्णांवर आयसोलेशन विभागात उपचार सुरु आहेत. जिल्हाधिकारी डॉ. चौधरी म्हणाले,""कोरोना प्रादुर्भावाच्या दुसऱ्या टप्प्यात आपण असून येणारा तिसरा टप्पा अतिशय महत्त्वाचा असल्याने सर्वांनी काळजी घ्यावी. आरोग्य कर्मचाऱ्यांनी एकजुटीने संकटाला सामोरे जात आहेत.'' 
.

दहा तासात अहवाल 
स्वॅपचे नमुने तपासणीसाठी यापूर्वी पुण्यातील प्रयोगशाळेत पाठविले जात होते. त्यामुळे अहवाल प्राप्त होण्यास सुमारे दोन-तीन दिवसांचा कालावधी लागत होता. मिरज सुरू झालेल्या प्रयोगशाळेमुळे सुमारे दहा तासाच्या आत अहवाल प्राप्त होणार आहे. त्यामुळे पुढील उपचारपद्धती तातडीने सुरू करण्यात येईल. 

 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG, 2nd T20I: रवी बिश्नोईची 'ती' चूक महागात पडली! जेकब बेथलच्या आक्रमणामुळे भारताविरुद्ध इंग्लंडचा ऐतिहासिक विजय

IND vs ENG, 2nd T20I: अक्षर पटेलने इंग्लंडच्या कॅप्टनला आऊट करत घडवला इतिहास; यापूर्वी कोणत्याही भारतीय फिरकीपटूला जमलं नव्हतं!

जळगावमध्ये भीषण अपघात! टोलनाक्यावर उभ्या ट्रकला गॅस टँकरची धडक, बघता क्षणी घेतला पेट, आगीत होरपळून दोघांचा मृत्यू

Latest Marathi Update : राज्यासह देशविदेशात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

Raigad Heavy Rain : रायगडला मुसळधार पावसाचा तडाखा; अंबा नदी धोक्यापलीकडे, भेरव पूल पाण्याखाली, पोलादपुरात दरड कोसळल्याने नागरिकांचे स्थलांतर

SCROLL FOR NEXT