water well.jpg 
पश्चिम महाराष्ट्र

तलाव, विहिरींनी गाठला तळ...या तालुक्‍यातील स्थिती, पावसाळ्यातही पाणी टंचाई 

रवींद्र मोहिते

वांगी(सांगली)-  वांगी परीसरात गेल्या 15 दिवसांपासून पावसाने हुलकावणी दिली असून उन्हाची तीव्रता प्रचंड वाढू लागली आहे. त्यांमुळे बऱ्याच गावातील तलाव, बंधारे, ओढे आटले आहेत. विहिरीतील पाण्यानेही तळ गाठला आहे. परीणामी पिके जगवायची कशी ? या विवंचनेत शेतकरी आहेत . 

कडेगाव तालुक्‍यात गेल्या वर्षी जुलै - ऑगस्ट महिन्यात मुसळधार पाऊस पडला होता. अनेक गावातील नद्या, ओढे, बंधारे, तलाव ओसंडून वाहत होते. मुसळधार पावसामुळे अनेक गावातील रस्ते काही दिवस पाण्याखाली होते. त्यामुळे वर्षभर शेतकऱ्यांना शेतीच्या पाण्याची टंचाई जाणवली नाही. मात्र यावर्षी पावसाळा सुरु होऊन 2 महिने उलटले तरी पाऊस पडत नसल्याने शेतकरी हतबल झाला आहे.

पेरलेले चांगले उगवून आले आहे. मात्र पावसाअभावी आता ते वाळू लागले आहे. खरीप पिक वाया गेले तर जनावरांच्या चाऱ्याची समस्या शेतकऱ्यांसमोर वर्षभर निर्माण होणार आहे. त्यामुळे पशुधन जगवायचे कसे हा प्रश्न सध्या शेतकऱ्यांसमोर गंभीर बनला आहे. शिवाय वर्षभराच्या अन्न -धान्यांची कमतरता ही शेतकऱ्यांना भासणार आहे. सध्या तालुक्‍यात सोयाबीन, भूईमूग, ज्वारी, उडीद, मका यांसह अन्य पिकांची 23 हजार 343 हेक्‍टरवर पेरणी झाली आहे. मात्र सध्या पावसाअभावी पिके वाळू लागल्याने पिके कशी जगवायची असा प्रश्न सध्या शेतकऱ्यांसमोर आहे. तर काही ठिकाणी पावसाअभावी पिकांची ऊगवण न झाल्याने शेतकरी चिंताग्रस्त बनला आहे. 

23 हजार हेक्‍टरवर पेरणी 
कडेगाव तालुक्‍यात सोयाबीन ,भूईमूग, ज्वारी , उडीद , मका यांसह अन्य पिकांची 23 हजार 343 हेक्‍टरवर पेरणी झाली आहे. काही ठिकाणी अपवाद वगळता उगवणही चांगली आहे. या पिकांना दमदार पावसाची गरज आहे. तालुक्‍यात सध्या दरवर्षी पेक्षा यंदा पावसाचे अत्यल्प आहे. पाऊस जर वेळेत पडला नाहीतर पेरणी वाया जाऊन शेतकऱ्यांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागणार आहे. यासाठी एकमेव उपाय असणाऱ्या ताकारी योजनेचे पाणी तात्काळ सोडून शक्‍य तेवढे जित्राबं वाचवण्याची शेतकऱ्यांतून मागणी होत आहे. 

संपादन : घनशाम नवाथे 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Anna Hazare : जनसेवा हीच ईश्वर सेवा,आता जोपर्यंत शरीरामध्ये प्राण आहे तोपर्यंत जनतेची सेवा करणार

Pune Crime : मैत्रिणीशी बोलत असल्याच्या रागातून स्पर्धा परिक्षेच्या विद्यार्थ्याचे अपहरण करणाऱ्या आरोपींना १५ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी

Beed Scam : बीडमध्ये ७ कोटींचा महाघोटाळा! २० वर्षांच्या भाडेपट्ट्यावरील जमिनीवर डल्ला; एसबीआयचे व्यवस्थापक, सरपंचासह ६ जणांवर गुन्हा दाखल

Maratha Reservation: अभिजित दीपके घेणार मनोज जरांगेंची भेट; तारीख अन् वेळही ठरली

Marathi News Live Updates : राजकारण ते हवामान...; एका क्लिकवर वाचा दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी

SCROLL FOR NEXT