Lali wins the Purushottam Trophy 
पश्चिम महाराष्ट्र

महाराष्ट्रात उधळली "लाली' 

सकाळ वृत्तसेवा

नगर : पुरुषोत्तम करंडकाच्या महाअंतिम फेरीतही नगरची "लाली' उधळली. 

न्यू आर्टस, कॉमर्स ऍण्ड सायन्स महाविद्यालयाच्या "लाली' एकांकिकेने हा इतिहास घडवला. प्रथम क्रमांकासह तीन वैयक्‍तिक पारितोषिकेही या एकांकिकेने पटकावली. यापूर्वी नगरच्याच "माईक'नेही हा बहुमान पटकावला होता. 

महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये महाराष्ट्रातील मानाच्या समजल्या जाणाऱ्या पुरुषोत्तम करंडक एकांकिका स्पर्धेची महाअंतिम फेरी 27 ते 29 डिसेंबर या कालावधीत पुण्यातील भरत नाट्य मंदिरात झाली. या स्पर्धेत पुणे विभागातून नगरची "लाली' सहभागी झाली होती. पुरुषोत्तमच्या अंतिम फेरीतही या एकांकिकेने प्रथम पारितोषिक मिळविले होते. या एकांकिकेचे लेखन व दिग्दर्शन कृष्णा वाळके याने केले आहे. महाअंतिम फेरीत सर्वोत्कृष्ट एकांकिकेचे प्रथम पारितोषिक "लाली'ला, सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचे प्रथम पारितोषिक कृष्णा वाळकेला, सर्वोत्कृष्ट पुरुष अभिनयाचे प्रथम पारितोषिक संकेत जगदाळेला, तर सर्वोत्कृष्ट स्त्री वाचिक अभिनयाचे पारितोषिक रेणुका ठोकळेला मिळाले. 

"माईक' व "लाली'ने यश मिळविल्यामुळे महाराष्ट्रात नगरच्या नाट्य कलाकारांना नवीन संधी उपलब्ध होणार आहे. महाअंतिम फेरीचा पारितोषिक वितरण समारंभ रविवारी (ता. 29) उशिरा ज्येष्ठ रंगकर्मी चं. प्र. देशपांडे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. या वेळी महाराष्ट्रीय कलोपासकचे अध्यक्ष अनंत निघोजकर, परीक्षक श्‍याम जोशी, शुभांगी दामले, प्रा. प्रवीण भोळे यांच्यासह महाराष्ट्रीय कला उपासक संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते. 

 
"लाली'चा प्रवास 
"लाली'च्या जन्मापासूनचा आत्तापर्यंतचा प्रवास अवघा 30 प्रयोगांचा आहे. मात्र, या एकांकिकेने 10 सांघिक करंडक व 45 वैयक्‍तिक करंडक असा बक्षिसांचा खजिनाच लुटला आहे. पुरुषोत्तम गाजविणाऱ्या "माईक'मध्येही कृष्णाचा सहभाग होता. 

 
"माईक'नंतर "लाली'ने पुरुषोत्तमच्या महाअंतिम फेरीचा करंडक मिळविल्यामुळे नगरच्या तरुण नाट्य कलावंतांत उत्साह व आशेचे वातावरण आहे. या दोन्ही एकांकिकांनी नगरच्या नाट्य कलावंतांना एक नवा ऊर्जेचा स्रोत दिला आहे. 
- कृष्णा वाळके, "लाली'चे दिग्दर्शक व लेखक 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs NAM : भारताचा सर्वात मोठा विजय, ९३ धावांनी नामिबियाला नमवले; पाकिस्तानला चेपले, रविवारी IND vs PAK मध्ये Super 8s चा फैसला

IND vs NAM : भारतीय संघावर 'Fixing' चा आरोप! इशान किशनच्या विकेटवरून पाकड्यांनी वाद पेटवला, नेमकं काय घडलं?

Imran Khan Jail Torture : इम्रान खान यांचा तुरुंगात छळ सुरू ; एक डोळा पूर्णपणे निकामी होण्याच्या मार्गावर!

Education Reform : विद्यापीठांवर फसवणुकीचे गुन्हे दाखल करावेत का ? सामाजिक कार्यकर्ते डॉ. अभय बंग यांचा सवाल

Ahmedabad Plane Crash: अहमदाबाद विमान अपघातात पायलट दोषी? इटालियन वृत्तपत्राच्या दाव्यावर भारताची प्रतिक्रिया

SCROLL FOR NEXT