पश्चिम महाराष्ट्र

अखेरची संधी... आता नाही तर पुन्हा कधीच नाही

विजयकुमार सोनवणे


सोलापूर : सन 1969 पूर्वी अथवा नंतर नावाशिवाय केवळ जन्माची नोंद झालेल्या नागरिकांना आपल्या जन्माची नोंद करून दाखला मिळवण्याची अखेरची संधी उपलब्ध झाली आहे. याबाबतचा अध्यादेश जारी करण्यात आला आहे. 14 मे 2020 नंतर वंचित राहिलेल्यांना जन्मनोंदणी करता येणार नाही, अशा सूचना राज्याच्या आरोग्य सेवा उपसंचालकांनी राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या जन्म-मृत्यू नोंद विभाग निबंधक व उपनिबंधकांना दिले आहेत. 

जन्मदाखल्याची गरज लागतेच 
शाळा-महाविद्यालयात प्रवेश असो की नोकरी; तसेच आयुष्यातील अनेक बाबींसाठी अथवा परदेशगमनासाठी जन्मदाखला आवश्‍यक ठरतो. पूर्वीच्या तुलनेत सद्यस्थितीत आपल्या कुटुंबातील सदस्यांच्या जन्मदाखल्यांसाठी सर्वच आग्रही असतात. 1969 पूर्वी अथवा नंतर नावाशिवाय केवळ जन्माची नोंद झालेल्या नागरिकांना आपल्या जन्माची नोंद करून दाखला मिळवण्याची अखेरची संधी उपलब्ध झाली आहे. 

14 मे 2020 डेडलाईन
ज्या नागरिकांची जन्माची नोंदणी 1 जानेवारी 2000 पूर्वी झालेली आहे, ज्यांच्या नोंदणीला 15 वर्षांचा कालावधी पूर्ण झाला आहे, अशा सर्व नागरिकांना जन्मनोंदणीची संधी मिळणार आहे. किंबहुना 1969 पूर्वी नोंदणी केलेल्या व्यक्ती अथवा त्यांच्या पालकांनादेखील जन्मनोंद करता येणार असून ही मुदत केवळ 14 मे 2020 पर्यंतच उपलब्ध असेल. त्यानंतर हा कालावधी कुठल्याही परिस्थितीत वाढवून मिळणार नाही, अशी सूचना देण्यात आली आहे.

हे द्यावे लागतील पुरावे
नागरिकांना नावाच्या खात्रीसाठी शाळा सोडल्याचा दाखला, शैक्षणिक प्रमाणपत्र, पासपोर्ट, पॅनकार्ड, आधारकार्ड यापैकी एका पुराव्यासह जन्म व मृत्यू नोंदणी कार्यालयात अर्ज करावा लागणार आहे. महाराष्ट्र 


 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan-Afghanistan War Video: पाकिस्तानात घुसून अफगाणिस्तानचा एअर स्ट्राईक, लष्करी तळ उद्ध्वस्त; व्हिडिओ पुराव्याने खळबळ

Exam Cheating: हद्दच झाली राव! थेट भोंगा लावून सांगितली प्रश्नांची उत्तरे, बारावीच्या परीक्षेत कॉपीचा असाही प्रकार; गुन्हा दाखल

Latest Marathi News Live Update : नाशिकमध्ये २५५ कुटुंबांचा हिंदू धर्मात पुनर्प्रवेश, नरेंद्राचार्यांचा गंभीर आरोप

Hingoli News: ‘बाबा, माझा पेपर आहे, मला लवकर सलाइन द्या’ मुलाची वडिलांना विनवणी, उपचाराला नेताना मृत्यू

Solapur Couple Case : तरुणाच्या त्रासाला कंटाळून दाम्पत्यानं संपवलं जीवन; 'तो' फोनवरून भेटायला बोलवायचा अन्..., अंथरुणात सापडली मृत्यूपूर्वी लिहिलेली चिठ्ठी

SCROLL FOR NEXT