download.jpg 
पश्चिम महाराष्ट्र

ताजी बातमी ःवायफळे येथे  तरूणाला कोरोनाची लागण 

सकाळवृत्तसेवा

तासगाव (सांगली ः तासगाव तालुक्‍यातील वायफळे येथे ठाण्याहून आलेल्या एका युवकाला कोरोनाची लागण झाल्याचे आज स्पष्ट झाले. तालुक्‍यातही कोरोना रुगणांची संख्या यामुळे सहा झाली आहे. मिरजेला पाठविलेल्या दोघांपैकी एकाचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने गावात खळबळ उडाली आहे. 

वायफळे येथील सैनिक मळ्यातील एका घरातील चार ते पाच जण लोक तीन दिवसांपूर्वी मुंबईहून आले होते. त्यांना येथील जिल्हा परिषद शाळेत क्वारंटाईन करण्यात आले होते. बुधवारी रात्री उशिरा संबंधित युवक व त्याच्या वडिलांना कोरोनाची लक्षण आढळून आल्याने दोघांनाही वायफळे आरोग्य केंद्राच्या रुग्णवाहूकेतून मिरजेला हलवण्यात आले होते.

मात्र वडिलांना त्रास जाणवत नसल्याने त्यांना परत वायफळेकडे पाठवण्यात आले होते. तर संबंधित युवकाला मिरज येथे कोव्हिड रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. कालच त्याची चाचणी घेण्यात आली होती. त्याचा अहवाल प्रतीक्षेत होता शुक्रवार दुपारी त्याचा अहवाल पॉझिटीव्ह आला. या युवकासोबत अलेल्याना तासगाव येथे इन्स्टिटयूशनल क्वारंटाईन करण्यात येणार आहे.

दरम्यान आरोग्य यंत्रणा सक्रिय झाली असून गट विकास अधिकारी तालुका आरोग्य अधिआकरी यांच्यासह पोलीस पथक वायफळे येथे पोहोचले आहे. ज्याव भागात हा युवक कवारताईन करण्यात आला होता गो परिसर आता सील करण्याची तयारी प्रशासनाने सुरू केली आहे 

शिवाय या युवकांच्या संपर्कातील लोकांची यादी काढण्यात येत आहे.यापूर्वी तालुक्‍यात गव्हाण येथे 1, कचरेवाडी येथील 2, शिरगाव येथील 1 तासगाव येथील 1 असे कोरोना रुग्ण सापडले आहेत वायफळे येथे एक जण सापडल्याने आता तालुक्‍यात कोरोना रुग्णाणची संख्या 6 झाली आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RCB ठरला IPLमधला सर्वात महागडा संघ, नव्या मालकांनी मोजले १६ हजार ७०० कोटी रुपये

उद्धव ठाकरेंची निरोपाच्या भाषणात टोलेबाजी! PM मोदींपासून DyCM शिंदेंपर्यंत, सिलिंडर ते रेडा; कवितेतून मुख्यमंत्र्यांना कोपरखळ्या

वीटभट्टी व्यावसायिकाकडे कारवाई टाळण्यासाठी मागितली लाच, १० हजार घेताना महिला अधिकाऱ्याला अटक

Pimpari News : गॅस टंचाईचा फटका; विद्यार्थ्यांना अर्धपोटी राहण्याची वेळ

क्रीडा अधिकारी ते उप कर्णधार! Rinku Singh कडे कोलकाता नाइट रायडर्सने दिली मोठी जबाबदारी

SCROLL FOR NEXT