Law in the state on the land of Andhra Pradesh: Minister Tanpure 
पश्चिम महाराष्ट्र

हे मंत्री म्हणतात... आंध्रप्रदेशच्या धर्तीवर राज्यात कायदा करू 

एकनाथ भालेकर

राळेगणसिद्धी : कॅबिनेट मंत्री शंकरराव गडाख यांच्यानंतर आज राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनीही आज सकाळी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची भेट घेतली. अण्णांनी उपस्थित केलेल्या महिलांवरील अत्याचारासंदर्भातील प्रश्नांवर राज्य सरकार अत्यंत संवेदनशील आहे. आंध्र प्रदेशच्या धर्तीवर महाराष्ट्र सरकार कायदा करील, या भावना आपण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यापर्यंत पोचविणार असल्याची ग्वाही मंत्री तनपुरे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. 

विविध मागण्यांसाठी हजारे यांच्या मौन आंदोलनाचा आज सोळावा दिवस होता. राज्यमंत्री तनपुरे यांनी अण्णांची भेट घेत मौन आंदोलनाला पाठिंबा दिला. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सोमनाथ धूत या वेळी उपस्थित होते. मंत्री तनपुरे म्हणाले, की महाविकास आघाडी सरकारच्या मंत्रिमंडळात शपथ घेतल्यानंतर पहिल्यांदा नगर जिल्ह्यात येत असताना अण्णांचे आशीर्वाद घेतले. निर्भया प्रकरणातील गुन्हेगारांना जलद फाशी होण्याबाबत केंद्र सरकार असंवेदनशील असल्याचे अण्णांनी लेखी संदेशात सांगत तीव्र नाराजी व्यक्त केली. अण्णांच्या भावना आपण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यापर्यंत पोचविणार आहोत.''

मंत्री तनपुरे यांचा अण्णांना शब्द 
अण्णांनी मला आशीर्वाद देताना तरुण नेतृत्वाकडून मला चांगल्या कामाची अपेक्षा आहे, असे मत व्यक्त केले. ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यामुळे आपणास मंत्रिपदाची संधी मिळाली. त्या संधीचे मी सोने करीन. आदरणीय अण्णांचे समाजसेवेचे कार्य पाहत मी लहानाचा मोठा झालो. सार्वजनिक जीवनात व राजकीय जीवनात काम करीत असताना तुमच्या विश्वासाला तडा जाऊ दिला जाणार नाही, असा शब्द राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी राळेगणसिद्धीत अण्णांना दिला.  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ऑनलाइन ग्रोसरी ऑर्डर करण्याआधी सावधान! Blinkit च्या फ्रीजरमध्ये जिवंत उंदीर आढळला; स्टोअरचा व्हिडिओ व्हायरल

पेपरमध्ये ढीगभर चुका, UGC-NET परीक्षेचे तीन पेपर पुन्हा होणार, तारीखही जाहीर...

Rohit Sharma: बाप रे बाप...! सायकलवरून हजारो किमीचा प्रवास करून आलेल्या फॅनला भेटल्यावर कशी होती रोहितची रिअ‍ॅक्शन, Viral Video

Phone Charging Tips: Airplane Mode ON करून फोन चार्ज केला तर काय होतं? जाणून घ्या

Shirur Bypass Crash: शिरूर बायपासवर पुन्हा बळी; तुटलेल्या दुभाजकातून दुचाकी नेणे जीवावर बेतले

SCROLL FOR NEXT