Laziness should not hinder tax collection
Laziness should not hinder tax collection 
पश्चिम महाराष्ट्र

आळसंदमध्ये करवसुली कामात अडथळा नको 

दिपक पवार

आळसंद : येथे राष्ट्रीय पेयजल योजने अंतर्गत 2 कोटी 17 लाख रुपयांची योजना पुर्ण करण्यात आली आहे. 19 फेब्रुवारी 2020 रोजी कार्यान्वित केली आहे. योजनेद्‌वारे शुद्ध पाण्याचा पुरवठा होत आहे. मात्र, काहीजण जाणूनबुजून गैरसमज पसरवण्यासाठी ग्रामपंचायतीची पाणीपट्टी भरु नका, असे आवाहन करीत आहेत. त्याचा कर वसुलीत अडथळा होत आहे. 

शासकीय कामात मुद्दामहून अडचण निर्माण करणाऱ्यांवर कारवाई करावी, अन्यथा उद्या (ता. 1) ग्रामपंचायतीमोर हॉलमध्ये धरणे आंदोलन, लाक्षणिक उपोषण करणार आहे, असे सरपंच इंदूमती जाधव यांनी जि. प. चे मुख्य कार्यकारी अधिकारी व जिल्हा पोलिस प्रमुखाना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. 
पालकमंत्री जयंत पाटील, जिल्हाधिकारी व गटविकास अधिकारी पं. स. विटा यांना आजी माजी पदाधिकाऱ्यांच्यावतीने या निवेदनाच्या प्रती देण्यात आल्या आहेत. 

निवेदनात म्हटले आहे, की आळसंद येथील ग्रामस्थांच्या पिण्याचा पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी शासन दरबारी सन 2012 -2103 मध्ये तत्कालीन गृहमंत्री दिवंगत आर. आर. पाटील व तत्कालीन ग्रामविकाम मंत्री जयंत पाटील यांच्या माध्यमातून पाठपुरावा व प्रयत्न करुन मंजुरी मिळवली होती. गावात सुमारे 2 कोटी 17 लाख रुपये निधीची राष्ट्रीय पेयजल योजना मंजूर झाली. पूर्वीच्या कारभाराचा अनुभव पाहता योजना पारदर्शकपणे व उत्कृष्ट व्हावी यासाठी योजना जिल्हा परिषदेमार्फत राबवावी, अशी मागणी केली होती.


संपादन : प्रफुल्ल सुतार 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

आता मसाल्यातही भेसळीची फोडणी! लाकडाचा भुसा, Acid चा वापर; १५ टन बनावट मसाला जप्त

Aavesham: 30 कोटींचं बजेट अन् कमाई 140 कोटी; ब्लॉकबस्टर ठरला फहाद फासिलचा आवेशम, ओटीटीवर कधी होणार रिलीज?

Karan Johar : "आई सोबत टीव्ही पाहत होतो पण.. " करण जोहर भडकला, कॉमेडीयनने मागितली माफी; कोण आहे केतन सिंह ?

Gadchiroli: स्फोटकांनी भरलेले 6 प्रेशर कुकर अन् डिटोनेटर नष्ट...मातीच्या खाणींचा शोध घेण्यासाठी गेलेल्या जवानांची कारवाई

Sunil Gavaskar Video : गावसकरांचा जुना VIDEO व्हायरल, रनरेटवरून विराटवर टीका केल्यानंतर झाले ट्रोल

SCROLL FOR NEXT