Leak to the right canal of Sankh Lake; Waste of water 
पश्चिम महाराष्ट्र

संख तलावाच्या उजव्या कालव्याला गळती; पाण्याची नासाडी 

राजू पुजारी

संख : येथील मध्यम प्रकल्प पाटबंधारे अधिकारी यांच्या हलगर्जीपणामुळे तलावाच्या उजव्या कालव्याला गळती होऊन लाखो लिटर पाण्याची नासाडी होत आहे. ते बंद करण्याची मागणी परिसरातील शेतकऱ्यांकडून होत आहे. संख मध्यम प्रकल्प पूर्ण होऊन वीस वर्षे होऊन गेले. ते साडेअठरा एकर जमिनीवर संख मध्यम प्रकल्प तलाव व्यापलेला आहे. 

मध्यम प्रकल्प बांधून झाल्यावर पहिल्यांदा 1995 ला एका रात्रीत पाऊस झाल्याने पूर्णपणे भरला. हे तलाव 703 दशलक्ष घनफूट पाणी भरण्याची क्षमता आहे. या मध्यम प्रकल्पाला दोन गेट आहेत. एक उजवा कालवा तर, दुसरा डावा कालवा. उजवा कालवा पावणे दोन किलोमीटर भिवर्गी ओढापर्यंत तर डावा कालवा बत्तीस किलोमीटर उमदीपर्यंत अंतर इतका आहे. यंदा पाऊस झाल्याने संख मध्यम प्रकल्प तलाव पूर्णपणे भरलेला आहे. 

परंतु उजवा कालव्याला गळती पडलेली असून त्यामधून लाखो लिटर पाणी वाया जात आहे. तसेच पाटबंधारे कर्मचाऱ्यांचे लक्ष नसल्याने व रात्र पाळीला वॉचमन नसल्यामुळे उजव्या कालव्याच्या मेन गेटच्या व्हील रॉड मधून अज्ञाताने कापून नेली आहेत. यंदा पाऊस चांगला झाल्यामुळे तलावाच्या पूर्व भागातील शेतकरी सुखावला आहे. तलावात भरपूर पाणी आहे म्हणून शेतकरी ऊस, मोठ्या प्रमाणात लावण केली आहेत. अनेक शेतकरी या पाण्याचा भरवशावर पेरणी केली आहेत. परंतु कालव्याला गळती सुरू झाल्याने शेतकरी हतबल झाले आहेत. 

जलसंपदा मंत्र्यांना निवेदन 
जलसंपदा मंत्री जयवंत पाटील यांना गळती संदर्भात निवेदन आम्ही शेतकरी दिले आहे तरी त्याची अद्याप हालचाल झालेली नाही. तरी संबंधित अधिकारी व मंत्री यांनी लक्ष घालून ते बंद करावा, अशी मागणी सोसायटीचे माजी चेअरमन मल्लिकार्जुन पुठाणी यांनी केली आहे. 


संपादन : प्रफुल्ल सुतार 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Devendra Fadanvis Statement : माणिकराव कोकाटेंच्या राजीनाम्यावर मुख्यमंत्र्यांनी मौन सोडलं, खात्यांचा पदभार सोपवला

IND U19 vs SL U19 SF Live: भारत-श्रीलंका सामना रद्द झाल्यास कोण जाईल फायनलला? बांगलादेशकडून पाकिस्तानचा करेक्ट कार्यक्रम

Latest Marathi News Live Update : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या सुनावणीला सुरुवात

Epstein Files Explained : मोदी सरकार कोसळणार? एपस्टीन फाइल्स काय आहे, भारतातील नेते का घाबरले? संपूर्ण माहिती एका क्लिकवर...

Success Story: रामटेकच्या कार्तिक बावनकुळेचा युपीएससीत डंका; आयआयटी जमले नाही, युपीएससीला घातली गवसणी

SCROLL FOR NEXT