Leakage of cement dams at Valvan; Resolution resolution 
पश्चिम महाराष्ट्र

वलवण येथील सिमेंट बंधाऱ्यांना गळती; दुरूस्तीचा ठराव

सदाशिव पुकळे

झरे : वलवण (ता. आटपाडी) येथील शिंदे वस्ती जवळील बंधारा, कुंभार वस्तीवरील बंधारा या सर्व बंधाऱ्यांना गळती आहे तर अनेक ठिकाणी बंधारे तुटले आहेत. तरी बंधारे दुरुस्त करून देण्यासाठी ग्रामपंचायतीच्या मासिक सभेत ठराव करण्यात आले आहे. 

शिंदे मळा येथे सन 1995-96 मध्ये सिमेंट बंधारा बांधण्यात आला होता. त्यानंतर 2012 मध्ये पुनर्भरन दुरुस्ती करण्यात आली. परंतु बंधाऱ्याची गळती अध्याप थांबलीच नाही. नवीन बंधारा बांधण्यासाठी व त्याची दुरुस्ती करण्यासाठी असे दोन वेळा पैसे खर्च करून सुद्धा बंधाऱ्याची गळती सुरूच आहे. 

शासनाने पाणी साठून राहावे यासाठी सिमेंट बंधाऱ्यांची निर्मिती केली. सिमेंट बंधारा बांधल्यानंतर बंधाऱ्यामध्ये पाणी साचून राहून जमिनीतून शेतकऱ्यांच्या विहिरींना बोअरना परकुलेशन व्हावे यासाठी बंधाऱ्यांची निर्मिती करून अनेक ओढया नाल्यावर बंधारे बांधण्यात आले आहेत. अद्यापही मोठ्या प्रमाणात बंधारे बांधण्याचे काम सुरू आहे. 

अशाच पद्धतीने शिंदे मळा येथे सन 1995-96 मध्ये बंधारा बांधण्यात आला होता. त्यानंतर बंधाऱ्याचे पुनर्भरण 2012 मध्ये करण्यात आले. परंतु बंधाऱ्याची गळती निघालीच नाही. म्हणजे एकाच बंधाऱ्यावर दोन वेळा पैसे खर्च करून सुद्धा बंधाऱ्याची गळती निघाली नाही. या बंधाऱ्यामुळे शेतकऱ्यांना कोणताही फायदा झाला नाही. उलट शासनाचेच पैसे व्यर्थ गेले आहेत. याबाबत सामाजिक कार्यकर्ते शरद कारंडे यांनी ग्रामपंचायतीकडे तक्रार केली असता ग्रामपंचायत मासिक सभेमध्ये बंधाऱ्याची गळती काढावी, असे ठराव घेण्यात आले आहेत. 

नवीन बंधारा बांधण्यासाठी शासनाने पैसे खर्च करूनही बंधाऱ्याची गळती थांबलेली नाही. बंधाऱ्याचे काम निकृष्ट दर्जाचे झाले असून याची चौकशी करून बंधाऱ्याची गळती ताबडतोब बंद करावी. 
- शरद कारंडे, सामाजिक कार्यकर्ते, वलवण


संपादन : प्रफुल्ल सुतार 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Joe Root Record: सचिन तेंडुलकर - जेम्स अँडरसननंतर फक्त रुटनेच केला तो पराक्रम! पाँटिंग-स्टीव्ह वॉ यांचा मोडला विक्रम

Vastu Tips: घरात-बाल्कनीत पक्ष्यांचे घरटे असावे की नाही? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या घरटे हटवणे योग्य की अयोग्य?

Pune News : सत्ता असूनही प्रशासनावर अंकुशच नाही! भाजप नगरसेवकांचा घरचा आहेर; पदाधिकाऱ्यांवरही व्यक्त केली नाराजी

Adul News : शिवण क्लास न लावल्याच्या रागातून विवाहिने संपविले जीवन; दीड वर्षाच्या मुलाचे मातृछत्र हरपले

Strait of Hormuz: 'होर्मुझ'चं सोडा, इराणची नवीनच खेळी; अरबी समुद्रापर्यंत ‘रेस्ट्रिक्टेड झोन’ करण्याची योजना, जगावर नवं संकट

SCROLL FOR NEXT