leakage of gas in belgaum but no any mortality in this accident in belgaum 
पश्चिम महाराष्ट्र

बेळगावात पुन्हा गॅस गळती ; पण कोणतीही जीवितहानी नाही

मल्लिकार्जुन मुगळी

बेळगाव : बेळगाव शहरात पुन्हा एकदा गॅस गळतीची घटना घडली आहे. बॉक्‍साईट रोडवरील बसव कॉलनी येथे गॅस गळती झाल्याची माहिती मेगा गॅस कंपनीकडून देण्यात आली. यावेळीही स्मार्ट सिटी योजनेतील कामामुळेच गॅसवाहीनीचे नुकसान झाले व गळती लागल्याची माहितीही मिळाली आहे. गळतीची माहिती बसव कॉलनीतील रहिवाशांनी थेट अग्नीशमन विभागाला दिली, त्यामुळे अग्नीशमन विभागाचे जवान थेट घटनास्थळी पोहोचले. पण मुख्य गॅसवाहीनीला गळती लागली नसल्याचे जवानांच्या निदर्शनास आले. 

मुख्य गॅसवाहीनीतून घरगुती जोडणीसाठी जी लहान वाहीनी घालण्यात आली आहे, त्या वाहीनीचे नुकसान झाल्याचे निदर्शनास आले. त्याची माहिती मेगा गॅस कंपनीलाही देण्यात आली. कंपनीच्या प्रतिनिधीनी तेथे जावून ती गळती बंद केली. स्मार्ट सिटी योजनेतून तेथे भुयारी गटारीचे काम हाती घेण्यात आले आहे. ते काम सुरू असताना वाहीनीचे नुकसान झाले. या घटनेत फारसे नुकसान झाले नाही अशी माहितीही मेगा गॅस कंपनीकडून देण्यात आली. 

गेल्या तीन महिन्यात शहरात अनेक ठिकाणी गॅसवाहीनीला गळती लागली आहे. विशेष म्हणजे त्या प्रत्येकवेळी मुख्य गॅसवाहीनीलाच गळती लागल्यामुळे मेगा गॅस कंपनीचे मोठे नुकसान झाले आहे. शिवाय वेळेत गळती काढल्यामुळे संभाव्या धोकाही टळला आहे. प्रत्येक गळतीला स्मार्ट सिटी योजनेचे काम कारणीभूत ठरल्यामुळे मेगा गॅस कंपनीने यासंदर्भात कायदेशीर कारवाई करण्याचा निर्णयही घेतला होता. त्यांनी स्मार्ट सिटी योजनेचे व्यवस्थापकीय संचालक शशीधर कुरेर यांच्याकडे याबाबत तक्रारही केली होती. 

 पण गॅसवाहीनीची योजना हा स्मार्ट सिटी योजनेचाच भाग असल्याचे सांगून कुरेर यांनी मेगा कंपनीला गप्प बसविले. त्यामुळे आता कंपनीने आता तक्रार करणेही बंद केले आहे. पण गॅस गळतीचे सत्र अजूनही बंद झालेले नाही. मेगा गॅस कंपनीकडून मुख्य गॅस वाहीनी घालण्याचे काम जवळपास पूर्ण झाले आहे. शहरात अनेक निवासी भागात गॅस जोडण्याही देण्यात आल्या आहेत. पण गळतीच्या समस्येमुळे मेगा गॅस कंपनी हवालदिल झाली आहे.

संपादन - स्नेहल कदम 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Rain Alert : पुढचे २४ तास महत्त्वाचे मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता

Kasba Ganpati Pune: पुण्यातल्या कसबा गणपती मंडळाकडून दिलगिरी व्यक्त; विसर्जन मिरवणुकीला १३४ वर्षांत पहिल्यांदाच उशीर

IND vs WI : शुभमन गिलची विंडीज मालिकेतून माघार? मोहम्मद सिराजच्या वेगवान चेंडूवर दुखापत; BCCI च्या डॉक्टरांची पळापळ

Nepal PM: संयुक्त राष्ट्रांच्या अधिवेशनात नेपाळच्या पंतप्रधानांची जागतिक व्यवस्थेवर जोरदार टीका; भारताचाही उल्लेख

PM Kisan 24th Installment : पीएम किसानच्या २४व्या हप्ता ऑक्टोबरमध्ये मिळणार? शेतकऱ्यांना प्रतीक्षा; दसऱ्यापूर्वी खात्यात जमा होण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT