पश्चिम महाराष्ट्र

मिरजेत ऑक्सिजन प्लांटला गळती;सतर्कतेमुळे अनर्थ टळला

सकाळ वृत्तसेवा

मिरज (सांगली): शहरातील शासकीय कोविड रुग्णालयातील (Covid 19 Hospital) ऑक्सिजन प्लांटला आज सायंकाळी अचानक गळती लागली. रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी ही गळती वेळीच रोखल्याने अनर्थ टळला. घटनास्थळी अग्निशमन दलासह तहसीलदार डी. एस. कुंभार (Tehsildar d. S. Potter)यांच्यासह रुग्णालयातील सर्व वरिष्ठ अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. (Leakage-of-oxygen-plant-in-Miraj)

याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी

आज सायंकाळी साडेसातच्या सुमारास रुग्णालयातील ऑक्सिजन प्लांटला छोटीशी गळती लागल्याचा प्रकार प्लांटच्या देखभालीसाठी नियुक्त केलेल्या कर्मचाऱ्याच्या निदर्शनास आला. त्याने तातडीने ही गळती आपल्या सहकारी कर्मचाऱ्यांच्या सहाय्याने रोखली. याची माहिती रुग्णालयाच्या परिसरातील रुग्णांच्या नातेवाईकांना समजताच यापैकी काही नातेवाईकांनी रुग्णालय परिसरात धावपळ केली. यापैकी काहींनी माध्यम प्रतिनिधींशी संपर्क साधला आणि ऑक्सीजन प्लांटच्या शेजारी गर्दीही केली.या गर्दीमुळे अफवाही मोठ्या प्रमाणात पसरली आणि घटनेचे गांभीर्य अधिक वाढले. तोपर्यंत घटनास्थळी महापालिकेच्या अग्निशमन दलानेही धाव घेतली.

अत्यंत छोट्या प्रमाणात झालेली ही गळती काही मिनिटातच देखभालीसाठी नियुक्त केलेल्या कर्मचाऱ्यांनी रोखली. हा प्रकार गंभीर नसल्याचे या कर्मचाऱ्यांनी सांगितले.परंतु अफवांमुळे या घटनेचे गांभीर्य वाढले. घटनास्थळी रात्री उशिरापर्यंत तहसिलदार डी. एस. कुंभार यांचेसह अग्निशमन दल आणि वरिष्ठ पोलीस अधिकारी थांबून होते. येथील पोलीस बंदोबस्तही वाढवण्यात आला ठेवण्यात आला होता. याबाबत योग्य खबरदारी घेण्याच्या सूचना जिल्हाधिकारी डॉ चौधरी यांनी दिल्या.

शासकीय कोविड रुग्णालयातील ऑक्सिजन प्लांटमधील या गळतीबाबत महसूल प्रशासनाकडून गंभीर दखल घेण्यात आली. याबाबत तातडीने घटनेचा अहवाल रुग्णालय प्रशासनाकडून मागविण्यात आला आहे

- समीर शिंगटे, प्रांताधिकारी, मिरज

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan Airstrike Afghanistan : अफगाणिस्तानच्या कुनारमध्ये पाकिस्तानचा पहाटे एअर स्ट्राईक, अनेक नागरिक जखमी झाल्याची भीती

Ambad Fire: अंबडमध्ये पहाटे चार दुकानांना भीषण आग; साहित्य जळून खाक, ५० ते ६० लाखांचे नुकसान

Pune Solapur Railways: प्रवाशांसाठी मोठी बातमी! पुणे-सोलापूर रेल्वे प्रवास गतिमान; मांजरीपासून दोन नवीन मार्गिकांचे नियोजन, भूसंपादनाला सुरुवात

Marathi News Live Updates : 'गोकुळ'साठी आज भाजपचे शक्तिप्रदर्शन; अर्जासाठी उद्या शेवटचा दिवस

Asian Games: भारतीय खेळाडूंचे दणादण गोल! हॉकीमध्ये पहिल्या सामन्यात पुरुष व महिला संघांची धडाकेबाज विजयी सलामी

SCROLL FOR NEXT