LED scam in sangali jilha parishad
LED scam in sangali jilha parishad 
पश्चिम महाराष्ट्र

'एलईडी'तील घोटाळेबाजांचा जिल्हा परिषदेतच रुबाब मोठा

सकाळवृत्तसेवा

सांगली : जिल्ह्यातील तब्बल 120 ग्रामपंचायतींमध्ये झालेल्या एलईडी दिव्यांच्या खरेदी घोटाळ्यावर जिल्हा परिषदेत चकार शब्द काढला जात नाही. मिरज पंचायत समितीत त्यावर गदारोळ होत असताना जिल्हा परिषदेचे सदस्य गप्प का, हा विषय आता चर्चेत आला आहे. सुमारे दोन कोटींहून अधिक रकमेचा गफला करून गाव कारभारी आणि ग्रामसेवकांनी खिसे भरले आहेत. त्याची चौकशी आणि वसुली राहिली बाजूला, त्यातील काही घोटाळेबाजांचा जिल्हा परिषदेत रुबाब सुरु आहे.

'सकाळ'ने कुंडलापूर ग्रामपंचायतीतील एलईडी दिव्यांच्या खरेदीतील घोटाळा उजेडात आणला. त्यानंतर फटाक्‍यांची माळ लागावी त्याप्रमामे तब्बल सव्वाशे ग्रामपंचायतींची नावे या घोटाळ्यात समोर आली आहेत. सुमारे 1300 ते 1700 रुपये किंमतीचे दिवे साडेचार हजार ते आठ हजार रुपयांना खरेदी करण्याचा महाप्रताप गावकारभाऱ्यांनी केला आहे. मिरज पूर्व भागातील एका गावात तर याची टक्केवारी थेट 'आरटीजीएस' म्हणजे बँकेच्या खात्यावर वर्ग करून घेण्याचा प्रताप झाला आहे. हा घोटाळा करताना कोटेशनमध्ये घोळ करण्यात आले आहेत. बोगस कंपन्या दाखवून खरेदी केली आहे. 

गावच्या विकासासाठी आलेल्या पैशांची प्रचंड लूट करण्यात आली आहे. गावकारभारात मुरुम घोटाळ्यानंतर मोठा घोटाळा म्हणून हा चर्चेत आला. त्याची उचित दखल घेऊन तातडीने चौकशीची गरज असताना जिल्हा परिषद प्रशासनानेही वेळकाढूपणा चालवला आहे. 

या घोटाळ्यात नाव असलेल्या काही मंडळींचे दररोज जिल्हा परिषदेत दर्शन होत असते. काही जिल्हा परिषद सदस्य अशा घोटाळेबाजांना घेऊन जिल्हा परिषदेत फिरताना दिसतात. अधिकाऱ्यांकडे त्यांची उठबस सुरु असते. अशा पद्धतीच्या कारभाराने चौकशी होणार कशी आणि कारवाई कशी होणार, याबद्दल साशंकताच अधिक आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 RCB vs GT Live Score: बेंगळुरूचा कर्णधार फाफ डू प्लेसिसने जिंकला टॉस; गुजरातच्या प्लेइंग-11 मध्ये मोठे बदल

Congress : ''चार जूननंतर काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! एक काँग्रेस राहुल गांधींची तर दुसरी...'' प्रमोद कृष्णम् यांचा दावा

MPSC : मुख्य परीक्षा होऊन चार महिने झाले तरी निकाल लागेना; गट क संवर्गातील ७ हजार ५१० उमेदवारांचे भवितव्य टांगणीला

Viral Video: 'माझ्या आयुष्यातून निघून जा'; मेट्रोमध्येच भिडलं जोडपं, एकमेकांना मारल्या चापटा

Akshaya Tritiya 2024 : कुंडलीतील पितृदोष दूर करण्यासाठी अक्षय्य तृतीयेला करा हे उपाय, घरात नांदेल सुख-शांती 

SCROLL FOR NEXT