बेळगाव : विधान परिषद निवडणुकीसाठी अंतिम मतदार यादी जाहीर करण्यात आली आहे. त्यात कर्नाटक वायव्य शिक्षक मतदार संघामध्ये २५ हजार मतदार आहे. कर्नाटक पदवीधर वायव्य मतदार संघातील मतदारांची संख्या २० हजार, कर्नाटक पश्चिम मतदार संघातील मतदारांचा आकडा १७ हजार आहे. तिन्ही मतदारसंघ मिळून सुमारे १ लाख ४० हजार मतदार आहेत. विधान परिषद निवडणुकीमध्ये राष्ट्रीय पक्षांचे दिग्गज उमेदवार निवडणूक आखाड्यात आहेत. त्यामुळे यंदाची निवडणूक चुरशीची ठरली आहे. त्यासाठी मतदारांच्या गाठीभेटी आणि संपर्क वाढविला आहे.
कर्नाटक वायव्य शिक्षक मतदारसंघामध्ये २५ हजार ३८८ मतदार आहेत. कर्नाटक वायव्य पदवीधर संघातील मतदारांची संख्या ९९ हजार ५७८ आहे. याचबरोबर कर्नाटक पश्चिम शिक्षक संघामध्ये १७ हजार ९७३ मतदार आहेत. तसेच ७८ मतदान केंद्रे असून ४ अतिरिक्त केंद्रेही स्थापण्यात येत आहेत. तर १५ जून रोजी मतमोजणी होणार आहे.
कोरोनाचे नियम पाळत मतदान, मतमोजणी
कोरोनाबाबतची नियमावली पाळत मतदान आणि मतमोजणी घेण्याचे आदेश आहेत. शिवाय त्यासाठी एक समिती आहे. या समितीतर्फे नियोजन आणि कार्यवाही केली जाईल. मतमोजणीच्या ठिकाणीही नियम पाळले जातील.
मतदानाच्या वेळेत १ तास वाढ
निवडणूक विभागातर्फे मतदानाची तारीख आणि वेळ घोषित केली होती. त्यात मतदानाच्या वेळेत बदल करण्यात आला आहे. येत्या १३ जूनला मतदान असून त्यादिवशी सकाळी ८ ते दुपारी ४ या वेळेत मतदान होणार होते. मात्र, आता सकाळी ८ ते सायंकाळी ५ यावेळेत मतदान होणार आहे. १ तास मतदानाची वेळ वाढवली आहे.
मतदारसंघनिहाय मतदार आकडेवारी
कर्नाटक वायव्य शिक्षक मतदार संघ
जिल्हा पुरुष महिला इतर एकूण
बेळगाव ८५७३ ४७१४ ० १३२८७
बागलकोट ३६८० १४९३ ० ५१७३
विजापूर ४९८५ १९४३ ० ६९२८
एकूण १७२३८ ८१५० ० २५३८८
कर्नाटक वायव्य पदवीधर मतदार संघ
जिल्हा पुरुष महिला इतर एकूण
बेळगाव ३०,९९१ १४,१३२ १ ४५,१२४
बागलकोट २४,३२७ ९३२२ २ ३३६५१
विजापूर १५७२२ ५१०० १ २०८२३
एकूण ७१,०४० २८५५४ ४ ९९५९८
कर्नाटक पश्चिम शिक्षक मतदार संघ
जिल्हा पुरुष महिला इतर एकूण
कारवार २०२२ १५८३ ० ३६०५
धारवाड ३४५० २९९५ ० ६४४५
हावेरी ३२४९ १३७४ ० ४६२३
गदग २२६२ १०३८ ० ३३००
एकूण १०,९८३ ६९९० ० १७९७३
शिक्षक मतदारसंघातील उमेदवार
अरुण शहापूर (भाजप), चंद्रशेखर लोणी (धजद), प्रकाश हुक्केरी (कॉंग्रेस), अप्पासाहेब कुरणे, चंद्रशेखर गुडसी, जयपाल देसाई, एन. बी. बन्नूर, बसप्पा मनीगार, श्रीकांत पाटील, श्रीनिवासगौडा गौडर, श्रेनिक जंगटे, चिक्कनरगुंद संगमेश (सर्व अपक्ष)
पदवीधर मतदारसंघातील उमेदवार
सुनील संक (कॉंग्रेस), हणमंत निराणी (भाजप), जे. सी. पटेल, यल्लाप्पा कलकुट्री, आदर्शकुमार पुजारी, घटगेप्पा मगदूम, दिपिका एस., निंगाप्पा बजंत्री, भीमसेन बागी, आर. आर. पाटील, सुभाष कोटेकल (सर्व अपक्ष).
दृष्टीक्षेपात...
शिक्षक मतदार संघातील उमेदवार १२
पदवीधर मतदार संघातील उमेदवार ११
तिन्ही मतदार संघातील मतदार - सुमारे १.४० लाख
मतदान - १३ जून (वेळ : सकाळी ८ ते सायं ५)
मतमोजणी - १५ जून (वेळ : सकाळी ८ वाजल्यापासून) ज्योती कॉलेज
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.