shirala bibatya.jpg 
पश्चिम महाराष्ट्र

शिराळा तालुक्‍यात येथे बिबट्याचा हल्ला...दोन कालवडी ठार

सकाळवृत्तसेवा

शिराळा (सांगली)- बिऊर (ता. शिराळा) येथील संजय आनंदा पाटील यांच्या वस्तीवरील जनावरांच्या शेडमधील दोन कालवडी बिबट्याने हल्ला करून ठार केल्या. ही घटना गुरुवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडली.

याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी- बिऊर गावाच्या पश्‍चिमेला गावानजीक संजय पाटील यांचे जनावरांचे शेड आहे. गुरुवारी नेहमीप्रमाणे जनावरांना वैरण घालून ते घरी आले. आज शुक्रवारी पहाटे साडेपाच वाजण्याच्या सुमारास वस्तीवर गेल्यानंतर जनावरांच्या गोठ्यात एक कालवड मृतावस्थेत आढळून आली, तर दुसरी कालवड जागेवर नव्हती. शेड परिसरात शोध घेतला असता दोनशे मीटर अंतरावर शेजारील उसाच्या शेतात बिबट्याने नेऊन ती फस्त केल्याचे आढळून आले.

या बाबत पाटील यांनी वन विभागाला माहिती दिली. त्यावेळी वन विभागाचे वनरक्षक सचिन पाटील, बाबा गायकवाड, वनपाल चंद्रकांत देशमुख, संतोष कदम यांनी घटनास्थळी भेट दिली. घटनास्थळी बिबट्याचे ठसे आढळून आले. त्यामुळे हा हल्ला बिबट्यानेच केला असल्याचे सिद्ध झाले.

यावेळी वनरक्षक सचिन पाटील म्हणाले की, या परिसरात वन्यप्राण्यांचा वावर असून रात्रीच्या शेतात जाताना बॅटरी किंवा मोबाईलवर गाणी लावून जावे. शेतात काम करत असताना आजूबाजूला लक्ष ठेवावे. रात्री जनावरे बंदिस्त गोठ्यात बांधावीत. गोठ्यात रात्री लाईट लावावी. लहान मुले अंगणात खेळत असताना त्यांच्यावर लक्ष ठेवावे. बिबट्याच्या हल्ल्याने आज सकाळपासून बिऊर परिसरातील नागरिक धास्तावले आहेत. गेल्या पाच-सहा महिन्यांपासून कांदे मांगले, शिंगटेवाडी परिसरामध्ये बिबट्याचा वावर व जनावरांवरील हल्ले सुरू असल्याने नागरिकांच्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे वन विभागाने या बिबट्याचा तातडीने बंदोबस्त करावा, अशी मागणी नागरिकांच्यातून होत आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rupali Chakankar: अखेर रुपाली चाकणकर यांचा राजीनामा! सुनेत्रा पवारांशी चर्चा करुन घेतला निर्णय

धर्मांतर कायद्यानंतर आता UCC! महाराष्ट्रात समान नागरी संहिता लागू करणार? विवाह, वारसा, घटस्फोट नियमांमध्ये होणार बदल

Ashok Kharat: ''अजित पवारांच्या निवासस्थानाबाहेर घडलेला प्रकार गंभीर...'', आमदाराचं मुख्यमंत्र्यांना पत्र

अमरावतीत स्वच्छतेचा बोजवारा; कंत्राटदार नियुक्तीच्या प्रक्रियेला खीळ; सत्ताधाऱ्यांसह विरोधकांच्या तलवारी म्यान

Latest Marathi News Update: राज्यासह देशात आज कुठे काय घडलं? जाणून घ्या...

SCROLL FOR NEXT