leopard Goat Attack
leopard Goat Attack 
पश्चिम महाराष्ट्र

बिबट्याचा शेळ्याच्या कळपावर हल्ला

सकाळ वृत्तसेवा

राहुरी : शहरापासून अवघ्या तीन किलोमीटरवरील सातभाई व पोपळघट वस्तीवर काल (मंगळवारी) मध्यरात्री दोन वाजता बिबट्याने धुमाकूळ घातला. शेतात मेंढपाळाच्या बसविलेल्या शेळ्या-मेंढ्यांच्या कळपावर बिबट्याने हल्ला केला. त्यात एक शेळी ठार केली. शेळीचे करडू जवळच्या उसात नेऊन फस्त केले. मेंढपाळ मच्छिंद्र विठोबा बाचकर (रा. जांभळी, ता. राहुरी) यांचा मेंढ्यांचा कळप शेतात बसविलेला आहे. 

आज सायंकाळी सव्वा सहा वाजता आमदार प्राजक्त तनपुरे यांनी घटनास्थळी भेट दिली. वन अधिकाऱ्यांनी पंचनामा केला. एक शेळी घटनास्थळी मृतावस्थेत आढळून आली. बिबट्याने करडू ओढून नेल्याचे मेंढपाळाने वन अधिकाऱ्यांना सांगितले. उसाच्या शेतापर्यंत बिबट्याच्या पायाचे ठसे आढळले. वन खात्याने पिंजरे लावून बिबट्याला जेरबंद करावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. 

ऐनतपूरमध्ये बोकडावर बिबट्याचा हल्ला 
दरम्यान, श्रीरामपूर तालुक्‍यातील ऐनतपूर परिसरात बिबट्याची दहशत निर्माण झाली आहे. तारेच्या संरक्षक कुंपणावरून गोठ्यात प्रवेश करून बिबट्या शेळ्या ओढून नेत असताना त्याचा पाठलाग केला. त्यामुळे बिबट्याने बोकड सोडून पळ काढला. काल  रात्री आठच्या सुमारास ही घटना घडली. 

बिबट्याची संरक्षण भिंतीवरून उडी 
काल रात्री ऐनतपूर येथील भाऊसाहेब कुताळ यांच्या वस्तीवर रात्री बिबट्याने हल्ला चढवला. कुटुंबातील सर्वजण टीव्ही पाहत असताना आठच्या सुमारास बिबट्याने तारेच्या संरक्षक कुंपणावरून गोठ्यात प्रवेश केला. छोट्या बोकडाला पकडून बाहेर पळ काढताना शेळ्या जोरजोरात ओरडल्या. त्यामुळे कुटुंबासह वस्तीवरील तरुण बाहेर आले. त्यांनी बॅटरी लावून पाहिले असता बिबट्याच्या तोंडात बोकड दिसला. 

बोकड टाकून बिबट्या पळाला 
तरुणांनी धाडस दाखवत बिबट्याचा पाठलाग केला. बिबट्याने तोंडातील बोकड टाकून पळ काढला. बोकड वाचविण्यात यश आले असले, तरी त्याला गंभीर जखम झाली आहे. आठ दिवसांपूर्वी बाळासाहेब नवले यांच्या घरासमोरील बोकडावरही बिबट्याने ताव मारला. सध्या ऊसतोडी सुरू झाल्याने उसाचे क्षेत्र रिकामे होऊ लागल्याने बिबट्या आता मानवी वस्तीकडे धाव घेऊ लागला आहे. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar : रोहित पवार झाले भावनिक, अजित पवारांनी केली नक्कल! म्हणाले, असली नौटंकी...

PCB T20 WC 2024 : टी 20 वर्ल्डकप जिंकला तर पाकिस्तानी खेळाडू होणार करोडपती; PCB ने दिलं मोठं आश्वासन

LinkedIn Job Search : नोकरीची चिंता आता सोडा.! लिंक्डइनवर जॉब शोधण्याची ‘ही’ आहे सोपी पद्धत

IPL 2024 PBKS vs CSK Live Score : सीएसकेचाही पलटवार; पंजाबची गळती सुरू जवळपास निम्मा संघ गारद

Baramati Lok Sabha Election : 'तुम्ही आमचा जीव, आत्मा आहात...' बारामतीमधील सभेत रोहित पवारांना अश्रू अनावर

SCROLL FOR NEXT