Leopard Sakal
पश्चिम महाराष्ट्र

Sangli Leopard News : बिसूरमध्ये बिबट्याचा वावर; नागरीक भयभीत, खबरदारीचे आवाहन

बिसूर (ता. मिरज) येथे काल रात्रीपासून बिबट्याचा वावर सुरू आहे.

- शैलेश पेटकर shaileshpetkar२@gmail.com

सांगली - बिसूर (ता. मिरज) येथे काल रात्रीपासून बिबट्याचा वावर सुरू आहे. गावातील एका दुकानाच्या सीसीटीव्ही फुटेजमध्येही तो टिपला असून गावांत भितीचे वातावरण पसरले आहे.

दरम्यान, ही बातमी मिळताच मानद वन्यजीव रक्षक अजितकुमार पाटील, प्राणीमित्र मुस्तफा मुजावर, स्थानिक ग्रामपंचयातीचे सरपंच, सदस्य यांनी धाव घेतली. वनविभागाने मात्र पाच तासाने हजेरी लावली. केवळ खबरदारीचे आवाहन केले जात आहे. कर्नाळ परिसरातून काही दिवसांपुर्वी दिसलेला हा बिबट्या असण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

अधिक माहिती अशी, की मिरज तालुक्यातील बिसूर येथे गेल्या दोन दिवसांपासून बिबट्याचा वावर असल्याची चर्चा सुरू होती. मात्र, काल रात्री अकराच्या सुमारास तेथील एका दुकानाच्या सीसीटीव्हीत तो कैद झाला. तो व्हिडिओ वाऱ्यासारख्या परिसरात व्हायरल झाला. त्यानंतर तातडीने नागरीकांनी खबरदारी घेण्यास सुरूवात केली.

प्राणीमित्रांसह स्थानिकांनी आज दिवसभर त्याचा शोध घेतला. काही ठिकाणी पायांचे ठसेही मिळून आले. सायंकाळी तो ओढ्यालगतच्या परिसरात गेला. त्यानंतर पाच तासांनी वनविभागाची टीम दाखल झाली. त्यांनीही शोध मोहिम राबवण्यास सुरूवात केली.

दरम्यान, प्राणिमित्रांनी शहानिशा केली असता तो बिबट्याच असल्याचे खात्री झाली. प्राणिमित्राकडुन सगळ्या ग्रामस्थांना शांतता बाळगण्याची विनंती केली. बिबट्या हा माणसावर शक्यतो करुन हल्ला करत नाही. पण त्याला हुसकावण्याचा प्रयत्न केला किंवा त्याला काही इजा पोचवण्याचा प्रयत्न केला तर तो माणसावरती सुद्धा हल्ला करु शकतो. खबरदारी बाळण्याचे आवाहन, सरपंच सतीश निळकंठ, पोलिस पाटील, सतीश पाटील, प्राणीमित्र जावेद शेख, मुस्तफा मुजावर यांनी केले.

चार दिवसांपुर्वी कर्नाळ परिसरात बिबट्याची चर्चा सुरू होती. तोच बिबट्या पुढे गेला असण्याची शक्यता प्राणीमित्रांनी व्यक्त केली आहे. वनविभागाकडून रात्री उशीरा गस्त सुरू करण्यात आली आहे. रात्री शेतामध्ये जाणाऱ्‍या शेतकऱ्‍यांनी खबरदारी बाळगावी, असा सल्ला वन विभागाकडून देण्यात आला आहे.

१९२६ वर संपर्क साधा

वन्यजीव दिसून आल्यास १९२६ या टोल फ्री क्रमांकावर माहिती द्यावी. त्याच्या जवळ जाण्याचा अथवा हुस्कवण्याचा प्रयत्न नागरीकांनी करू नये, असे आवाहन वनविभागाकडून करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vidarbha Orange Alert : विदर्भाला ‘ऑरेंज अलर्ट’; राज्यात तीन दिवस पावसाची शक्यता पुणे घाटमाथ्याला ‘यलो अलर्ट’

IND vs NZ T20I Squad: भारत-न्यूझीलंड ट्वेंटी-२० मालिकेसाठी संघ जाहीर; अष्टपैलू खेळाडूची माघार, १५ जणांची तगडी टीम

PITRU PAKSHA 2026 VASTU TIPS: घरात सुख-शांती आणि सकारात्मकता राहिल टिकून! पितृपक्षापूर्वी फक्त 'या' ४ वस्तू बाहेर काढा

Marathi News Live Updates : माथेरान टॉय ट्रेनच्या मार्गावर दरड कोसळली

Ajit Pawar Jay Pawar : अजित पवारांचा 'अजित सृष्टी' देखावा पाहून जय पवारांना रडू आवरलं नाही; ‘आई अजून रडत असते का'?

SCROLL FOR NEXT