leopard attack 
पश्चिम महाराष्ट्र

VIDEO : कुत्र्याला घाबरला बिबट्या, हल्ल्यात घेतली माघार

सकाळ वृत्तसेवा

संगमनेर : भक्ष्याच्या शोधार्थ फिरणाऱ्या त्या निशाचराला भक्ष्याचा वास लागला. परिसराची चाहुल घेत त्याने दबे पाँव भक्ष्यावर झेप घेतली. सुमारे तीन मिfनटे चाललेल्या झुंजीत अखेर हिंस्त्र बिबट्याला उपाशीपोटी माघार घ्यावी लागली.... गंभीर जखमी झालेला तो जीव मृत्यूला हरवून परतला आहे.

सायखिंडीची घटना

संगमनेर तालुक्यातील सायखिंडी येथील ही घटना सीसीटीव्हीमध्ये बघताना अंगावर सर्रकन काटा येतो. लपणासाठी मुबलक उसाचे क्षेत्र, पिण्यासाठी पाण्याची उपलब्धता व गावाच्या परिसरातील वाड्यावस्त्यांवर सहजतेने मिळणारे भक्ष्य या आदर्श अधिवासामुळे गेल्या काही वर्षांत संगमनेर तालुक्यात बिबट्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे.

लपायला शेती

या परिसरातील उसाच्या शेतात जन्मलेले, जन्मापासून परिसरातील मानवांचा वावर, वाहनांचे आवाज यामुळे येथे वाढलेले शुगरकेन लेपर्ड मानवी अस्तित्वाला चांगलेच सरावल्याने, त्यांचा मानवी वस्तीच्या आसपास वावर वाढला आहे. उपजतवृत्तीमुळे मार्जारकुळातील हा चलाख प्राणी मानवी वस्तीच्या आसपासच आढळतो. त्याच्या कुशलतेने दडून बसण्याच्या सवयीमुळे त्याचे अस्तित्व जाणवत नाही इतकेच.

येथे झाला हल्ला
सायखिंडी गावाच्या शिवारातील म्हसोबा वस्तीवरील गट क्रमांक 172 मध्ये पशुचिकीत्सक डॉ. सागर गांडोळे यांचे राहते घर व शेजारी गोठा आहे. प्राणीप्रेमी असलेल्या गांडोळे यांनी लॅब्रोडोर जातीचे तीन कुत्रे पाळले आहेत. त्यातील दोन कायम पिंजऱ्यात बंदिस्त असतात तर एक मोकळ्यावर बांधलेला असतो. त्याच्या जोडीला एक गावठी कुत्रेही असते.

असा दबक्या पावलांनी आला

शनिवार ( ता. 15 ) रोजी रात्री साडेबाराच्या सुमारास त्यांच्या वस्तीवर एका मोठ्या बिबट्याने मोर्चा वळवला. बिबट्याची चाहुल लागताच गावठी कुत्र्याने धुम ठोकली. मात्र, त्याच्या तावडीत बांधलेला लॅब्रोडोर कुत्रा सापडला. त्या कुत्र्याच्या गळ्याला पकडून ठार करण्याचा प्रयत्न करणाऱ्या बिबट्याशी त्याने निकराची झुंज दिली. त्यामुळे त्याला सोडून बिबट्याला काढता पाय घ्यावा लागला.

उपचारानंतर तो परतला

ही सर्व घटना सीसीटीव्हीत कैद झाल्याचे सकाळी डॉ. गांडोळे यांनी पाहिले. स्वतः पशुचिकित्सक असलेल्या डॉक्टरांनी कुत्र्याच्या मानेवरचे चार घाव, औषोधोपचाराने बरे केल्याने, त्यांचा आवडता कुत्रा मृत्यूला हरवून परतल्याचा त्यांनाही आनंद आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

साहिल मोबाईल वापरून करत होता कॉपी, परीक्षेवेळचा CCTV VIDEO आला समोर

Mohol News : मोहोळ तालुक्यातील मंदिरातील वाढत्या चोऱ्या संदर्भात पोलीस सतर्क; व्यवस्थापक पुजारी व ट्रस्टी यांच्या तातडीच्या बैठकीचे आयोजन, अकरा सूचनांचे पालन करण्याची सूचना

Mangalwedha News : मनरेगा योजनेतील रोजगार सेवकासाठी नव्याने काढलेल्या शासन निर्णयावरून राज्यभरात संताप

IIT Bombay Student Death : आयआयटी बॉम्बे बाहेर 'जस्टिस फॉर साहिल' आंदोलन; प्रकाश आंबेडकरांचे पुत्र सुजात यांच्या नेतृत्वाखाली जोरदार निदर्शने, प्रशासनाला दिला कडक इशारा

IAS मेधा रूपम यांना दिलासा, हायकोर्टाच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयाकडून स्थगिती

SCROLL FOR NEXT