Leopards killed Asian highway third incident Valva sakal
पश्चिम महाराष्ट्र

आशियायी महामार्गावर बिबट्या ठार

वाळवा तालुक्यातील तिसरी घटना.

सकाळ वृत्तसेवा

नेर्ले : येथील आशियाई महामार्गावर रिलायन्स पेट्रोल पंपा जवळ अज्ञात वाहनाच्या धडकेत तीन वर्षे वयाच्या मादी जातीचा बिबट्या ठार झाला. ही घटना रात्री दोनच्या सुमारास घडली. महामार्गावर अपघात होताच महामार्गावर पेट्रोलिंग करणाऱ्या कासेगाव पोलिसांनी व विभागास तात्काळ माहिती दिली यावेळी वन विभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल होऊन त्यांनी उत्तरीय तपासणीसाठी बिबट्याचे शव इस्लामपूर येथे न्हेले.वाळवा तालुक्यात आशियाई महामार्गावर अपघातात बिबट्या ठार होण्याची ही तिसरी घटना आहे. बिबट्या साठी महामार्ग मृत्यूचा सापळा बनत असल्याचे चित्र आहे. यामुळे बिबट्याच्या अस्तित्वाचा धोका वाढला आहे.

नेर्ले ता वाळवा येथे महामार्गाच्या आजूबाजूला ऊसशेती मोठ्या प्रमाणामध्ये असल्यामुळे बिबट्यांचा वावर या परिसरात वारंवार होत आहे. बिबट्या महामार्गावरून वारंवार प्रवास करीत असतात.येथील रिलायन्स पेट्रोल पंपा जवळ रात्री दोनच्या सुमारास बिबट्या महामार्ग ओलांडत असताना अज्ञात वाहनाच्या धडकेत ठार झाल्याची घटना घडली.धडकेत गंभीर जखमी झालेल्या बिबट च्या पोटाला,बरकडीला मार लागल्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला.बिबट्याचा मृत्यू झाल्याचे कळताच वन विभागाचे वन अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी मृत बिबट्याचे शव ताब्यात घेऊन त्याची उत्तरीय तपासणी साठी इस्लामपूर येथे न्हेले.

वाळवा तालुक्यात बिबट्याचा अधिवास धोक्यात आला आहे.बिबट्याचा वाहनांच्या धडकेत अथवा अपघातामध्ये मृत्यू होऊ नये यासाठी वनविभागाकडून उपाय होणे गरजेचे आहे.अथवा महामार्गावर सूचना फलकांची आवश्यकता आहे.यापूर्वी काळमवाडी,इटकरे,व आता नेर्ले येथे बिबट्याचा मृत्यू झाला आहे.वनक्षेत्रपाल सचिन जाधव, वनपाल सुरेश चरापले, वनरक्षक अमोल साठे , वनकर्मचारी बाबासाहेब गायकवाड यांनी घटनास्थळी भेट दिली. इस्लामपूर येथील वनविभागाच्या कार्यालयात सहायक वनसंरक्षक डॉ. अजित साजणे, मानद वन्यजीव रक्षक डॉ. अजितकुमार पाटील ,वनक्षेत्रपाल सचिन जाधव यांच्या उपस्थितीत डॉ. अंबादास माडकर यांनी शवविच्छेदन केले. त्या नंतर बिबट्याचे दहन करण्यात आले.

बेलगाम वाहतूक..धडकी भरवणारी भरधाव वाहने..

आशियाई महामार्गावर बेलगाम वाहतूक सुरू असून मोटर कार चालक भरधाव वेगाने वाहने चालवत असल्याचे चित्र आहे.यावर महामार्ग पोलिसांनी लक्ष दे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs WI 2nd ODI : शुभमन गिलने झळकावले इतिहासातील वेगवान द्विशतक! विक्रमांचा पाऊस अन् टीम इंडियाचा वर्ल्ड रेकॉर्ड

Amitabh Bachchan : अमिताभ बच्चन सेटवर घसरून पडले, गुडघ्याला दुखापत; उभं राहता येईना, नेमकं काय घडलं?

Pune News: MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला ब्रेक; मुख्यमंत्र्यांच्या बैठकीनंतर २ ऑक्टोबरचे सत्याग्रह आंदोलन तात्पुरते स्थगित

Rohit Sharma Celebration : शतकानंतर रोहित शर्माच्या सेलिब्रेशनची चर्चा अन् सुनील गावस्कर काय म्हणाले ऐका Video Viral

Sharad Pawar Drought Tour : शरद पवार करणार दुष्काळ दौरा; पुणे जिल्ह्यातील तीन तालुक्यांना देणार भेट

SCROLL FOR NEXT