Leopards return to chandoli forest Sanctuary sangli marathi news
Leopards return to chandoli forest Sanctuary sangli marathi news 
पश्चिम महाराष्ट्र

Video : सांगलीत जेरबंद झालेला बिबट्या आता अधिवासात, पाहा व्हिडीओ

सकाळ वृत्तसेवा

सांगली :  सांगलीत राजवाडा चौकात गुरुवारी सकाळी दाखल झालेल्या बिबट्याला रात्री साडेनऊ वाजता पिंजराबंद करण्यात आले. त्यानंतर त्याला कुपवाडच्या वनविभागाच्या कार्यालयाच्या आवरात पिंजऱ्यात ठेवण्यात आले होते. भूलीचे इंजेक्‍शन दिल्याने रात्री बारापर्यंत तो बेशुध्दावस्थेत होता. तेथे कुलरने त्याला गारवा देण्यात आला. सलाईन व प्राथमिक उपचार देण्यात आले. सुदैवाने त्याला कोणतीही इजा झालेली नव्हती. त्यामुळे रात्री बारानंतर त्याला शुध्द आली. चांगली तरतरी होती. त्यानंतर वनविभागाच्या पथकाने मध्यरात्रीच त्याला चांदोली राष्ट्रीय अभयारण्याच्या दिशेने हलवले. तेथे पहाटे साडेतीनच्या सुमारास नैसर्गिक आधिवासात त्याची मुक्तता झाली. पिंजऱ्याचे दार उघडतात अतिशय चपळाईने त्याने छलांग मारत मुक्ततेचा आनंद लुटला. वाट चुकलेल्या बिबट्याला पुन्हा सुस्थितीत नैसर्गिक अधिवासात मुक्त केल्याचा मोठा आनंद सुमारे 24 तासाच्या यशस्वी सुटका मोहिमेचे सार्थक झाले. 

कृष्णाकाठच्या शांत सांगलीला काल बिबट्याने हादरून सोडले. काल सकाळी सहाच्या सुमारास राजवाडा चौकातील आयसीआयसी बॅंकेजवळ बिबट्याचे दर्शन झाले. काही लोक तेथे मॉर्निंग वॉक करून टपरीवर चहा घेत बसले होते. तेथे त्यांना पहिल्यांदा हा प्राणी दिसला. तो बिबट्या आहे की अन्य कुठला प्राणी यावर चर्चा सुरू झाली. तोच त्याने लोकनेने राजारामबापू पाटील बॅंकेच्या परिसरात एका कुत्र्याला फटक्‍यात ठार केले. त्याची शिकार करून त्याने कुत्र्याला विचित्र पद्धतीने फाडले. ते रक्ताच्या थारोळ्यात पडले होते. त्याच रक्ताने माखलेल्या पायांनी बिबट्या बॅंकेच्या परिसरातील पायऱ्यांवर फिरला. त्या ठशांनीच "हा बिबट्याच आहे', असे स्पष्ट झाले. 

बिबट्याने कुत्रे ठार केले. त्याला तेथेच सोडून त्याने रस्ता ओलांडला आणि राजवाडा चौक ते पटेल चौक याला जोडणाऱ्या रस्त्यावरील पश्‍चिमेला तोंड करून असलेल्या कीर्ती मेडिकलच्या पाठीमागील गोदामाच्या दिशेने गेला. त्या मार्गात एक मोठा फलक आणि पत्रे लावलेले होते. त्यावरून उडी मारून त्याने आडोसा शोधला. ही बातमी समजल्यानंतर, रेस्क्‍यू टीमसह विनविभाग, पोलिस प्रशासन दाखल झाले. राजवाडा चौकातील राजाराम बापू बॅंकेतील इमारतीत पाहणी केली. त्या ठिकाणी ठार झालेले कुत्रे मिळून आले. त्याच्याजवळ रक्ताचे बिबट्यांचे ठसे मिळून आले. त्यानंतर यंत्रणा हालली. 

अखेर दुपारी दोनच्या सुमारास कीर्ती मेडिकलजवळ बिबट्या लपल्याचे स्पष्ट झाले. त्याचा मागमूस लागला. त्यानंतर यंत्रणेला वेग आला. बिबट्याला बेशुद्ध करून पकडण्यासाठी कोल्हापूरचे शार्प शूटर दाखल झाले. तसेच पिंजरे, जाळी आदी साहित्यांसह सर्वजण पकडण्यासाठी दबा धरून बसले. त्याने जागा सोडावी आणि तो पिंजऱ्यात यावा, यासाठी काही प्रयोग करण्यात आले. मोठा आवाज केला गेला. तरीही तो पिंजऱ्यात आला नाही. त्यामुळे अखेर भुलीचे इंजेक्‍शन द्यायचा निर्णय घेण्यात आला.

सायंकाळी सातपासून ते प्रयत्न सुरू झाले. अडगळीत असल्याने अचून नेम बसत नव्हता. सात फैरी झाडण्यात आल्या. त्यानंतर रात्री साडेनऊच्या सुमारास नेम बसला आणि त्यानंतर काही क्षणात बिबट्या बेशुद्ध झाला. त्यानंतर यंत्रणेने त्याला पिंजऱ्यात ठेवून कुपवाडला वनविभागाच्या कार्यालय आवारात नेण्यात आले. त्याठिकाणी प्राथमिक वैद्यकीय उपचार देण्यात आले. रात्री एकच्या सुमारास चांदोलीच्या दिशेने हलवले. मध्यरात्रीच्या सुमारास बिबट्याला नैसर्गिक आधिवासात मुक्त करण्यात आले. तब्बल चोवीस तासानंतर यशस्वी सुटका मोहिम सार्थक झाली. 


संपादन- अर्चना बनगे
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024, KKR vs DC Live Score: चक्रवर्तीच्या चक्रव्यूहात अडकले दिल्लीचे धुरंधर, पण कुलदीपच्या फिनिशिंग टचमुळे कोलकातासमोर 154 धावांचं लक्ष्य

Covid 19 : कोविडची पहिली लस बनवणाऱ्या शास्त्रज्ञावर चीनची मोठी कारवाई; भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे केलं बरखास्त

Govinda Dance: गोविंदानं डान्स करुन केला धैर्यशील मानेंचा प्रचार; व्हिडिओ पाहा

Viral Video: गिल लावत होता फिल्डिंग अन् विराटने अचानक येऊन दिला जोरात धक्का, GT vs RCB सामन्यावेळी काय झालं पाहा

Latest Marathi News Update: दिवसभरात देशविदेशात काय घडलं? जाणून घ्या एका क्लीकवर

SCROLL FOR NEXT