leopards sangli devrashtre young boy 
पश्चिम महाराष्ट्र

रात्रीचा थरार ; बिबट्याच्या रूपात साक्षात मृत्यूच समोर उभा ; तरुणाची चलाखीने सुटका

स्वप्नील पवार

देवराष्ट्रे - बिबट्याने केलेल्या हल्यातून तरूणाचे प्रसंगावधान राखून स्वत:ची सुटका करून घेतली. संतोष होनमाने असे या धाडसी तरूणाचे नाव आहे.  

याबाबत अधिक माहिती अशी, संतोष हे गुरूवारी (ता. १०) कामानिमित्त ताकारीला गेले होते. तेथून परतताना त्यांना रात्री उशीर झाला. बिबट्याची दहशत मनात होतीच. तोच सागरेश्वर देवस्थानाजवळील बिरोबा देवालया नजीक आल्यानंतर संतोष यांना बिबट्या दिसला. क्षणात बिबट्याने संतोष यांच्याकडे धाव घेतली. 

परंतु, प्रसंगावधान राखत संतोष यांनी दुचाकीचा हाॅर्न वाजवत वेग वाढविला आणि बिबट्याच्या तावडीतून स्वत:ची सुटका करून घेतली. 

या घटनेच्या थराराविषयी संतोष यांनी ईसकाळशी बोलताना सांगितले की, बिबट्याला पाहताच क्षणी पायाखालची जमीन सरकली.  घाट असल्याने गाडीचा वेग  कमी होता.  बिबट्या 

अचानक दिसल्याने क्षणभर गोंधळलो होतो. बिबट्या आमच्या गाडीच्या दिशेने आमच्यावर धावून आला. एवढ्यात गाडीची गती वाढवली, हॉर्न वाजवला आणि वाचलो. बिबट्या मोठा आहे व तो त्या परिसरात असणार. वन विभागाने याची दखल घ्यावी व बिबट्याचा बंदोबस्त करावा.

मागील महिन्यात बिबट्या या परिसरात आला आहे. त्यामुळे परिसरासह अभयारण्य शेजारील शेतकरी वर्ग, लोकवस्ती येथे बिबट्याची दहशत आहे. अनेक नागरिकांना बिबट्या दिसला तर काहींच्या शेतात त्याचे ठसे दिसले. बिबट्याला पकडण्यासाठी तत्काळ पिंजरा लावावा व अन्य उपाययोजना करून त्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी नागरिक करीत आहेत.
 

संपादन - धनाजी सुर्वे 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lalbaugcha Raja Visarjan 2026 : लालबागच्या राजाच्या विसर्जनाला यंदाही होणार विलंब? गिरगाव चौपाटीवरील 'त्या' नैसर्गिक कारणामुळे वाढली चिंता; प्रशासनासमोर मोठं आव्हान

‘आईला सोडून कसा जाऊ? आधी तिला बाहेर काढतो’... शेवटपर्यंत झुंजला, अखेर बस आगीत माय-लेकाचा मृत्यू; अंगठीवरून पटली ओळख

‘तुम्हाला काय प्रॉब्लेम?’ सततच्या चर्चांवर गोविंदांचा सवाल; म्हणाला...‘माझ्या खासगी आयुष्याचा तमाशा करू नका’

Latest Marathi News Live Update : मुंबईत विसर्जन मिरवणुकीत दुर्घटना; प्रभादेवीत भरधाव कार थेट गर्दीत घुसली, चार जणांना दुखापत

Gyanesh Kumar Padma Bhushan : 'ज्ञानेश कुमार यांना पद्मविभूषण पुरस्कार द्या'; भाजप प्रदेशाध्यक्षांनी केली मागणी

SCROLL FOR NEXT