less presence for students to liable for exam in this year in belgaum 
पश्चिम महाराष्ट्र

विद्यार्थ्यांसाठी खुशखबर ; कमी हजेरी असली तरी यंदा परीक्षेला बसता येणार

सकाळ वृत्तसेवा

बेळगाव : दहावी, बारावीसह इतर वर्गातील विद्यार्थ्यांना यावेळी कमी हजेरी असली तरी वार्षिक परीक्षेला बसण्याची संधी मिळणार आहे. कोरोनाच्या संकटामुळे शाळा विलंबाने सुरु झाल्या आहेत. त्यामुळे परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये यासाठी शिक्षण खात्याने सर्व विद्यार्थ्यांना परीक्षेला बसण्याची संधी देण्याचा निर्णय घेतला आहे. 

कोरोनामुळे शैक्षणिक वर्षाचे वेळापत्रक कोलमडुले आहे. तब्बल नऊ महिन्यांच्या प्रतिक्षेनंतर शाळांना एक जानेवारीपासुन पुन्हा सुरुवात झाली आहे. मात्र अजुनही शाळांमध्ये विद्यार्थ्यांची संख्या समाधानकारक नसुन शाळांमध्ये 100 टक्‍के विद्यार्थी येण्याची प्रतिक्षा शाळांना लागुन राहीली आहे. मात्र शाळेत येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी शिक्षण खात्याने लागु केलेल्या विविध नियमांमुळे सर्वच विद्यार्थी शाळेत येतील की नाही याबाबत साशकंता आहे. त्यामुळे शिक्षण खात्याने यावेळी कमी हजेरी असली तरी विद्यार्थ्यांना परीक्षेला बसण्याची संधी देण्याचा निर्णय घेतला आहे.

राज्यातील लाखो विद्यार्थ्यांना शिक्षण खात्याच्या निर्णयाचा फायदा होणार आहे. नववी, दहावी आणि त्यापुढील अभ्यासक्रमांमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची हजेरी किमान 75 टक्‍कांपेक्षा असेल तरच विद्यार्थ्यांना परीक्षेला बसता येते. त्यामुळे शाळेला दांडी मारणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पालकांना पाल्याला नियमितपणे येण्याची सुचना करा, असे शिक्षक व प्राध्यापकांकडुन सांगितले जाते. तरीही अनेक विद्यार्थी शाळेत नियमितपणे येत नसल्याने कमी हजेरीच्या कारणाने त्यांना परीक्षेला बसता येत नाही.

गेल्या वर्षीही कमी हजेरी असल्याने बेळगाव शैक्षणिक जिल्हासह राज्यातील अनके विद्यार्थ्यांची परीक्षेची संधी हुकली होती. मात्र यावेळी कोरोनाच्या संकटामुळे शाळेत 75 टक्‍के हजर राहणे अवघड जाणार आहे. त्यामुळे शिक्षण खात्याने विद्यार्थ्यांना दिलासा देणारा निर्णय घेतला आहे. मात्र सर्वच विद्यार्थ्यांना शाळेत बसण्याची संधी मिळणार आहे. म्हणुन विद्यार्थ्यांनी जास्त दिवस शाळेला गैरहजर राहु नये अन्यथा विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार आहे. 

"शाळा बऱ्याच दिवसांच्या विलंबाने सुरु झाल्या आहेत, शाळांमध्ये विद्यार्थ्यांची संख्याही कमी प्रमाणात आहे. त्यामुळे ऑनलाईन  किंवा शाळेत येऊन शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना परीक्षेवेळी त्रास होऊ नये याची दखल शिक्षण खात्याने घेतली आहे. त्यामुळे यावेळी सर्व विद्यार्थ्यांना परीक्षेला बसता येणार आहे."

- ए. बी. पुंडलीक, जिल्हा शिक्षणाधिकारी

संपादन - स्नेहल कदम 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News: पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी; विसर्जन मिरवणुकीमुळे पीएमपी बसच्या मार्ग आणि स्थानकांत बदल, हे आहेत पर्यायी मार्ग

Bank News :ग्राहकांसाठी रविवारी बँका सुरू; २८ ते ३० सप्टेंबरच्या संपाच्या पार्श्वभूमीवर निर्णय

Nanded Farmers: ‘काजू-बदाम खा, पण शेतकऱ्यांना न्याय द्या’; अर्धापुरात काँग्रेसचा जनाक्रोश, घंटानाद करून दुष्काळ जाहीर

मुंबईकरांचा प्रवास सुसाट! ऑरेंज गेट ते मरीन ड्राइव्ह भुयारी मार्गासह 'ठाणे-बोरिवली'साठी दुय्यम कर्ज; सरकारचा मोठा निर्णय

Latest Marathi News Live Update : पुण्यात विसर्जन सोहळ्यासाठी महापालिकेची तयारी

SCROLL FOR NEXT