Let us go to our village : says gold melting professionalist in sangali 
पश्चिम महाराष्ट्र

आम्हाला आमच्या गावाकडे जाऊ द्या 

सकाळवृत्तसेवा

लेंगरे : परिसरातील बरचशे लोक पोटाची खळगी भरण्यासाठी गलाई व्यवसायानिमित्त देशभर विखुरले आहेत. देशाच्या कोणत्याही कानाकोपऱ्यात गेल्यास तिथे गलाई व्यावसायिकांनी आपली वेगळी छाप पाडली आहे. या गलाई व्यवसायाच्या माध्यमातून त्यांनी गावकडील गावागाडाही मोठ्या धाडसाने संभाळत. तसेच आपल्यासह ग्रामीण भागातील विकासासाठी धोरणात्मक पावले उचलत सहकार्य केल्याने गावचे रुपडे पालटले आहे. परंतु कोरोनाने या व्यावसायिकांची पुरते कंबरडे मोडले आहे. यातून सावरण्यासाठी गावाकडची आस लागली आहे. परंतु लॉकडाऊनमुळे त्याच ठिकाणी अडकून पडले आहेत. मात्र गावाकडे असणाऱ्या आई-वडिलांची काळजी त्यांना लागली आहे. लॉकडाऊन वाढल्यास आम्हाला आमच्या गावी जाण्याची परवानगी द्या, अशी मागणी त्यांच्यातून होत आहे.

खासदार संजय पाटील, आमदार अनिल बाबर यांनी सोशल मीडियावरून आहे तेथेच थांबा, असे आवाहन करत गावकडच्या माणसाची काळजी घेऊ असे सांगून व्यावसायिकांना धीर दिला होता. त्यामुळे (ता. 14) नंतर लॉकडाऊन संपल्यावर गावी जाऊन आई-वडिलांची गाठ भेट घेता येईल अशी आशा त्यांना होती. परंतु कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता लॉकडाऊन वाढणार असल्याचे पाहून त्यांची गावी येण्यासाठी धडपड सुरू झाली आहे. यासाठी लोकप्रतिनिधीनी लक्ष घालून गावी येण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे. सोशल मीडियावरून संदेश टाकत गावी येऊ द्या, असे आवाहन करताना दिसत आहेत. 

चौदा एप्रिल नंतर महाराष्ट्र, देशातील लॉकडाऊन उघडणार नसल्याचे संकेत सध्याच्या परिस्थिती वरून दिसत आहे. त्यामुळे भागातील बरेचशे गलाई बांधव लॉकडाऊनमुळे बाहेर अडकलेत. त्यांना गावी जाण्यासाठी परवानगी द्यावी. घरात डांबून ठेवण्यापेक्षा आमची तपासणी करून गावी पाठवा. तेथील आरोग्य केंद्रात पुन्हा एकदा तपासणी करून मगच घरी पाठवून होमक्वारंटाईन करा. परंतु दहा बाय दहाच्या खोलीत पाच, सहा माणसे एकत्र रहात असलेल्या जागेतून सुटका करा.

गावाकडे कुणाची आई गावी एकटीच आहे. तर प्रत्येक घरातील आमची काळजी करून आई-वडील आजारी पडलेत. प्रत्येक गलाई बांधव मालकच असेल अस नाही. तर त्यांच्या पेक्षा जास्त मजूर कामगार आहेत. त्यांच्या घरी पण आई-वडील दररोज कामाला जाऊन पोट भरत आहेत. गाडीभाड्यासाठी पाच पैसे सुद्धा देऊ नका पण, गावी जायाला परवानगी द्या, अशी मागणी जम्मू येथे व्यवसायानिमित्त स्थाईक असलेले रुपेश जाधव यांनी दूरध्वनीवरून संपर्क साधून "दै.सकाळ'शी बोलताना खदखद व्यक्त केली. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Power of Simple Living and Discipline : साधं राहणीमान अन् बचतीच्या जोरावर ४५व्या वर्षी निवृत्तीपर्यंत जमवले ४.७ कोटी; जाणून घ्या कसे?

Latest Marathi News Updates : दक्षिण मुंबईतील गणेशोत्सव मंडळांची बैठक सुरु, अडचणींवर व नियोजनाबाबत होणार चर्चा

Video: प्रेमाची तालिबानी शिक्षा! काकाच्या मुलीवर प्रेम जडलं; रागात गावकऱ्यांनी प्रेमीयुगुलांना नांगराला जुंपलं, व्हिडिओ व्हायरल

८ चेंडूंत ६ विकेट्स.. पाच त्रिफळाचीत ! Kishor Kumar Sadhak ने इंग्लंडमध्ये सलग दोन षटकांत घेतल्या दोन Hat-Tricks

Parenting tips: पेराल ते उगवेल, आई वडिलांकडून अशा प्रकारे सवयी शिकतात मुलं

SCROLL FOR NEXT