Let's change the face of Nevasha! 
पश्चिम महाराष्ट्र

नेवाशाचा चेहरामोहरा बदलू चला! 

सकाळ वृत्तसेवा

नगर : ""नेवासे शहरात सर्वसामान्य लोकांसाठी काम होणे गरजेचे आहे. शहराचा चेहरामोहरा बदलण्यासाठी दहा वर्षांचा विकास आराखडा सर्व ग्रामस्थ मिळून करू या. त्यासाठी मी चांगला वास्तुविशारद शहरात पाठवितो. त्यांना आपण सर्वांनी सहकार्य करा आणि काही नवीन कल्पना सुचवा. शहर सुंदर करण्यासाठी प्रत्येक नगरसेवकाला समान निधी द्या. हा आपला, तो विरोधात, असे करू नका,'' असे आवाहन युवा नेते प्रशांत पाटील गडाख यांनी आज केले. 

नेवाशाच्या नवनिर्वाचित नगराध्यक्ष योगिता पिंपळे आणि उपनगराध्यक्ष नंदकुमार पाटील यांचा नागरी सत्कार आज गडाख यांच्या हस्ते करण्यात आला. त्या वेळी ते बोलत होते. लक्ष्मण जगताप अध्यक्षस्थानी होते. 

सर्वांना पाच वर्षे खडतर गेली ः गडाख

""गेली पाच वर्षे सर्वांना खडतर व त्रासदायक गेली. हा विजय नसून जबाबदारी आहे. मनात कटुता न ठेवता जनहिताची कामे केली पाहिजेत. मी मागचे उकरणार नाही. आमदार शंकरराव गडाख यांच्या मार्गदर्शनाखाली आपल्याला विकासाची झेप घ्यायची आहे. शहरात नाना-नानी पार्क असले पाहिजे. मुलांना करमणुकीचे साधन पाहिजे. स्वच्छ पाणी जनतेला मिळाले पाहिजे. अशा अनेक समस्या सोडविण्यास प्राधान्य देऊन आपण काम करणार आहोत, असे प्रशांत गडाख म्हणाले.

 सर्वांनी याेगदान द्यावे 

शहराच्या विकासासाठी माझ्याकडे "व्हीजन' असून, सर्वांनी योगदान दिले पाहिजे. ही सर्व कामे अध्यक्ष व सगळ्या नगरसेवकांना करायची आहेत. त्यासाठी वेळ लागेल. आपण 10 वर्षांचा विकास आराखडा तयार करू. त्यासाठी प्रख्यात वास्तुविशारद माझ्या खर्चातून पाठवतो. त्यांना सहकार्य करा आणि तुमच्या सूचना त्यांना द्या. ही कामे नगरसेवकांना करायची आहेत. मी मार्गदर्शनास तयार आहे.'' 

जनतेच्या पैशांवर डल्ला मारला असेल तर चाैकशी हाेईल

""आम्ही कुणाला जेलमध्ये टाकायची भाषा करणार नाही. घनकचऱ्याची वादग्रस्त जागा, पाणीयोजनेतील भ्रष्टाचार यांसह अनेक बाबींवर आरोप झाले आहेत. जनतेच्या पैशांवर ज्यांनी डल्ला मारला असेल, त्याची निश्‍चितच चौकशी होईल,'' असा इशाराही गडाख यांनी दिला. 

यांची झाली भाषणे

उपनगराध्यक्ष पाटील, भाऊसाहेब वाघ, जानकीराम डौले, महेश मापारी, पोपट जिरे, सतीश पिंपळे यांनी मनोगत व्यक्त केले. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG : प्लेअर ऑफ दी मॅच पुरस्काराचा खरा मानकरी मी नाही... Sanju Samsonने विजयाचे श्रेय दिले दुसऱ्याला, मन जिंकणारे विधान; म्हणाला, तो नसता तर मी इथे उभा नसतो

ऐ बाई, बस खाली...! MS Dhoni ने जल्लोष करणाऱ्या साक्षीला का रोखले? IND vs ENG सामन्यातील सर्वात सुंदर क्षण Video Viral

T20 WC, IND vs ENG SF: टीम इंडिया फायनलमध्ये! २२ वर्षीय जेकब बेथलची कडवी झुंज अपयशी, ८ मार्चला जेतेपदासाठी न्यूझीलंडला भिडणार

Sukhoi Missing: मोठी बातमी! भारतीय वायुसेनेचं अत्यंत शक्तिशाली सुखोई फायटर जेट बेपत्ता; शोध मोहीम सुरु

Pune News : भाजप नगरसेवकांच्या निर्णयामुळे केंद्राच्या प्रकल्पाला अडथळा, ८ कोटींचा निधी परत जाण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT