KMR20A00955.jpg 
पश्चिम महाराष्ट्र

पुन्हा आख्खा मसूरची  चव चाखायला यावे... पहा कुठे 

दिलीप क्षीरसागर

कामेरी (सांगली) ः येथील राष्ट्रीय महामार्गालगत असणारे हॉटेल , धाब्यावर पार्सल व्यवस्था सुरू झालेने आख्खा मसूराची चव पुन्हा चाखायला मिळू लागली आहे. वाळवा तालुक्‍यातील कार्यक्षेत्रात असणाऱ्या कासेगांव ते कणेगांव या 31 किलोमीटरच्या अंतरात महामार्गावर जवळपास दीडशे ते दोनशे हॉटेल ,ढाबे ,आहेत. यातील बहुतांशी व्यवसायिकांनी पार्सल देण्याचे काम सुरू केले आहे.

कोरोणा पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून शासनाने हॉटेल ढाबे यावरील गर्दी टाळण्यासाठी हे व्यवसाय बंद ठेवण्याचे आदेश दिल्याने हे व्यवसाय बंद ठेवले होते. आता या व्यवसायिकांना आर्थिक फटका बसू नये म्हणून पार्सल देण्याचे परवानगी देण्यात आली आहे.

त्यामुळे आता खवय्यांना मसूर दाल तडका, पनीर, रोटी याचा आस्वाद घेता येणार आहे. पार्सल सुरू होताच अनेक जणांनी धाबे, हॉटेल कडे धाव घेतली आहे. परिसरातील लोक पार्सल साठी येऊ लागले आहेत. याच बरोबर राष्ट्रीय महामार्गावरील परगावाहून येणारे अनेक वाहनचालक पार्सल साठी येऊ लागल्याने हॉटेल चालकांनी विषेश खबरदारी घेतली आहे.

सुरक्षित अंतर, सॅनीटायझर वापर केला जात आहे तर पार्सल बरोबर द्रोन पत्रावळी देऊ लागले आहेत. बंदच्या काळात हॉटेल व्यवसायिकांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. काही हॉटेल,धाबे यावरिल कामगार अंगावर उचल घेऊन आपल्या गावी निघून गेले आहेत त्यांची प्रतीक्षा आता हॉटेल व्यावसायिकांना लागली आहे. शासनाने आता धाबे व हॉटेल यांना फक्त पार्सल ची सुविधा उपलब्ध करून दिल्याने हॉटेल व्यवसायिकांना थोडाफार दिलासा मिळाला आहे . 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

लॉन्चपूर्वीच सिक्रेट जगजाहीर! समोर आली Samsung Galaxy A57 अन् A37 स्मार्टफोनची किंमत; पाहा सगळे वेरिएंट एका क्लिकवर

Panchganga river pollution : पंचगंगा नदीत काळेकुट्ट पाणी; ऑक्सिजनअभावी मासे मृत, इचलकरंजीत खळबळ

Ajit Pawar: ''अशोक खरातच्या माध्यमातून अजित पवारांच्या घराबाहेर काळी जादू..'', कुणाचा हात? रोहित पवारांनी सांगितला घटनाक्रम

Monalisa Viral Girl Case : 'व्हायरल गर्ल' मोनालिसाचा चित्रपट दिग्दर्शकावर गंभीर आरोप; म्हणाली, 'सेटवर अनेक वेळा माझ्यासोबत...', मनोरंजन विश्वात उडाली खळबळ

Free AI Courses: गूगल, अ‍ॅमॅझॉसह ह्या ५ कंपन्या देत आहेत फ्री AI शिक्षण; जाणून घ्या कोर्स कुठे आणि कसा करायचा

SCROLL FOR NEXT