ration shop logo.jpg 
पश्चिम महाराष्ट्र

वाळवा तालुक्‍यात या दोन गावातील रेशन दुकानाचा परवाना रद्द 

सकाळवृत्तसेवा

बागणी (सांगली)- लॉकडाऊच्या कालावधीत नियमानुसार रेशन धान्य मिळत नसल्याची तक्रार नागरिकांनी केल्यानंतर तालुका पुरवठा विभागाने त्याची घेत बागणी (ता.वाळवा) येथील परवाना धारक रविंद्र दत्तात्रय चव्हाण याचा बागणी, काकाचीवाडी येथील दोन्ही स्वस्त धान्य दुकान परवाना रद्द केला. शिवाय 1 लाख 21 हजार रुपये दंड करण्यात आला. वाळवा पुरवठा अधिकारी बबन करे, मंडल अधिकारी प्रफुल्ल मालवदे, तलाठी श्री. गुरव, सरपंच प्रमोद माने यांनी उपस्थितीत ही कारवाई करण्यात आली.


गेली कित्येक वर्षे तोंड तांबुन बुक्‍क्‍यांचा मार सहन करीत आलेल्या काकाचीवाडी येथील नागरिकांनी दुकानदाराविरोधात तहसीलदारांकडे लेखी तक्रार देत प्रमाणापेक्षा धान्य कमी घालणे, खरेदी मालाच्या पावत्या न देणे अशा तक्रारीचे केल्या होत्या. संबंधित अधिकारी वर्गाने घटनास्थळी भेट देत अहवाल वरिष्ठांना पाठवला. दप्तर तपासणी मध्ये काही त्रुटी आढळुन आल्यावर लाभार्थीसाठी आलेले धान्याचा आणि विकलेल्या धान्याचा ताळेबंद लागत नसल्याचे ग्रुहीत धरुनच तालुका पुरवठा विभागाने परवाना रद्द केला.

लॉकडाऊच्या कालावधीत नागरीकांची गैरसोय होऊ नये म्हणून गहू, तांदुळ, डाळ, तेल अशा जीवनावश्‍यक वस्तू सवलतीच्या दरात शासन उपलब्ध करून देत आहे. परंतु रेशन दुकानदाराकडून मधल्या मधी काळाबाजार होत असुन गरीब व गरजू या पासून वंचित राहत आसल्याचे चित्र ग्रामीण भागातून समोर येत आहे. दरम्यान इथून पुढे बागणी येथील दुकान माळवाडी मजूर सोसायटीला वर्ग केले आहे. काकाचीवाडी येथील के. जी. पिरजादे दुकानदाराकडे चालवण्यासाठी दिले आहे.

 
"" लॉकडाऊनच्या कालावधीत ज्या लोकांना धान्य कमी मिळाले आहे. त्यांना ते परत मिळेल किंवा नाही त्यासबंधित प्रक्रीया अद्याप प्रलंबीत आहे. ती पूर्ण झाल्यावर त्याच्यावर निर्णय होईल.''
-बबन करे,
पुरवठा अधिकारी इस्लामपूर

 


 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MLAs Suspends: पक्षाविरोधी भूमिका नडली! BJD कडून सहा आमदारांचे तात्काळ निलंबन; टोकाचा निर्णय घेण्याचं नेमकं कारण काय?

Darvha Crime : सात वर्षीय चिमुकलीचा खून; शेजारच्या घरात पोत्यात सापडला मृतदेह

Ashok Kharat Files: ''योनी पूजनाचे धक्कादायक व्हिडीओ...'', नेत्याचा खळबळजनक दावा, कॅप्टन खरात नेमकं करायचा तरी काय?

Gas Cylinder Shortage : जनता 'गॅस' वर स्वयंपाक चुलीवर...; ग्रामीण भागासह शहरातील हाॅटेल व्यावसायिकांना फटका...

तरडे–शिंदवणे रस्त्यावर स्ट्रीट लाईटची मागणी; अपघात टाळण्यासाठी नागरिकांची पुढाकार

SCROLL FOR NEXT