Life sentence in murder 
पश्चिम महाराष्ट्र

खुनाच्या गुन्ह्यात आरोपीला जन्मठेप 

सकाळ वृत्तसेवा

नगर : आत्येभावाचा खून केल्याने एकाला जिल्हा व सत्र न्यायालयाने आज जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. ज्ञानेश्‍वर चंद्रकांत काळे (रा. वडुले बुद्रुक, ता. शेवगाव), असे आरोपीचे नाव आहे. 

आरोपी ज्ञानेश्‍वरने वडील चंद्रकांत काळे यांच्याशी ऑगस्ट 2018मध्ये वाद घातला होता. त्यात ज्ञानेश्‍वरने वडिलांना शिवीगाळ करीत चावा घेऊन गंभीर जखमी केले होते. याबाबत शेवगाव पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविला होता. दरम्यान, पोलिसांनी ज्ञानेश्‍वरला अटक केली. ज्ञानेश्‍वर अटकेत असताना त्याला भेटण्यासाठी वडील चंद्रकांत काळे व आत्येभाऊ संदीप गर्जे गेले होते. त्या वेळी ज्ञानेश्‍वरने संदीपला जामीनदार होण्याची विनंती केली. संदीपने जामीन देण्यास नकार दिला होता. त्याचा राग ज्ञानेश्‍वरच्या मनात होता. 

कैदेतून सुटल्यानंतर ज्ञानेश्‍वरने संदीपला भ्रमणध्वनीवरून शिवीगाळ केली. त्यामुळे संदीप व त्याचा भाऊ बापू गर्जे ज्ञानेश्‍वरला भेटण्यासाठी गेले होते. त्याने पुन्हा संदीप व बापूला चावा घेत जखमी केले, तसेच संदीपवर चाकूने जीवघेणा हल्ला चढविला. संदीपला उपचारासाठी दवाखान्यात नेले. मात्र, डॉक्‍टरांनी उपचारापूर्वीच त्याला मृत घोषित केले. 

या संदर्भात संदीपचा भाऊ अमोल गर्जे याने शेवगाव पोलिस ठाण्यात फिर्यादी दिली होती. त्यानुसार पोलिसांनी ज्ञानेश्‍वरला अटक करीत न्यायालयात हजर केले. जिल्हा व सत्र न्यायालयाने सहा जणांची साक्ष व पुरावे तपासले. साक्षीदार अमोल गर्जे व वैद्यकीय अधिकारी डी. एच. परदेशी, पंच पांडुरंग ढाकणे यांची साक्ष महत्त्वाची ठरली. न्यायालयाने ज्ञानेश्‍वर काळेला दोषी धरत आजन्म कारावास, तसेच दहा हजार रुपये दंड व दंड न भरल्यास सहा महिने सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावली आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune DJ Sound : डीजेसाठी आग्रही मंडळांच्या मागणीपुढे पोलिसांची नरमाईची भूमिका; चार बेस, चार टॉपला परवानगीची तयारी

China Alerts: पुढील तीन दिवसांत पुन्हा महापुराचा धोका! चीनकडून नेपाळला इशारा, नेमका अलर्ट काय?

Pune Processions : मिरवणुकांमध्ये नियमांचे उल्लंघन; सहा ठिकाणी कारवाई, ध्वनिक्षेपक यंत्रणाही जप्त

BMC Politics: मुंबई महापालिकेत सत्ताबदलाची नांदी! सव्वावर्ष शिंदेसेनेचा महापौर बसणार? भाजपला धक्का देण्याची तयारी; ‘मिशन टायगर’ची चर्चा

Pune News : ‘बीपीसीएल’चा कचरा प्रकल्प स्थायीने अडवला; बिनाखर्चाच्या प्रस्तावासाठी विशेष सभा घेणार

SCROLL FOR NEXT