शिराळा (जि. सांगली) : जिल्हाबंदीच्या आदेशामुळे शाहूवाडी तालुक्याच्या उत्तर भागातील जवळपास 20 गावातील लोकांचे जगणंच राम भरोसे झालं आहे. "जगावे की मरावे हेच कळतं नाही' अशा संतप्त भावना लोकांनी व्यक्त केल्या आहेत.
या भागातील अनेक गावातील लोकांना मुंबईत कोरोनाची लागन झाली असली तरी ते लोक थेट सी. पी. आर. व इतर ठिकाणी क्वारंटाईन झाल्याने त्यांचा गावाला धोका झाला नाही. कोरोनापासून गावे व गावकरी सुरक्षित आहेत. मात्र जीवनावश्यक वस्तूंच्या पुरवठ्याकडून असुरक्षित आहेत.
खरे तर शाहूवाडी तालुक्याच्या उत्तर भागातील लोकांचा जन्म शाहूवाडी तालुक्यात अन् जीवनाशी निगडीत असलेले सर्व व्यवहार हे शिराळा तालुक्यावर अवलंबून आहेत. दोन्ही तालुक्यामधून वाहणारी वारणा नदी हीच दोन जिल्ह्यांची सीमा. नाहीतर दोन्ही तालुक्यातील अंतर जास्ती जास्त दोन किलोमीटर. मात्र जिल्हा बंदीने सर्वांचे जगणे मुश्कील झाले. शाहूवाडी तालुक्यातील जवळपास वीस गावे व वाड्या वस्त्या शिराळा तालुक्यातील आरळा, चरण, शेडगेवाडी, कोकरूड येथील बाजारांवर अवलंबून आहेत.
तुरूकवाडी ते उखळू दरम्यानचे छोटे-मोठे किराणा व्यावसायिक शिराळा तालुक्यातील बाजारपेठांतील घाऊक व्यापाऱ्यांकडून माल खरेदी करतात. बॅंकींग, आठवडा बाजार, आरोग्य, दहावीनंतर पुढील शिक्षण यासाठी शिराळा तालुक्यातील सोनवडे, आरळा, शेडगेवाडी तर महाविद्यालयीन शिक्षणासाठी कोकरूड येथे यावे लागते.
तुरूकवाडी ते उखळू या वीस किलोमीटरच्या अंतरात पेट्रोलपंप नाही. करुंगली, शेडगेवाडी किंवा कोकरूड येथे यावे लागते. घरगुती गॅस सिलेंडरही शिराळ्यातूनच नेतात. मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाबंदी आदेश लागू असल्यामुळे कोकरूडचा पूल वगळता या परिसरातील उखळू-मणदूर, शित्तूर-आरळा, सोंडोली-चरण, बिळाशी-भेडसगाव पूल वाहतुकीसाठी बंद केला आहे. त्यामुळे छोट्या व्यावसायिकांना माल मिळत नाही. सगळे व्यवहार ठप्प आहेत.
बॅंकेत पैसे काढायचे कसे ?
सामान्यांवर आर्थिक संकट कोसळलेय. जिल्हा बंदीमुळे बॅंका, एटीएममधून पैसे काढायचे कसे? असा प्रश्न परिसरातील सामान्य शेतकरी, गरीब जनतेला पडला आहे. या जिल्हा बंदीच्या आदेशावर लोकांना दिलासा मिळेल असा काही मार्ग काढून लोकांचे हाल थांबवावेत, अशी मागणी आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.